Join us  

कोणता हेअर कलर आहे तुमच्यासाठी परफेक्ट?, जाणून घ्या, स्किन टोननुसार कसा निवडायचा हेअरकलर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 7:59 PM

केस पांढरे झाले म्हणून हेअर कलर लावायचा हा ट्रेण्ड आता कधीच मागे पडला आहे. आता गरज म्हणून नव्हे तर फॅशन म्हणून केस कलर केले जातात. पण आपल्या स्किनला काेणता हेअर कलर परफेक्ट दिसेल, यासाठी या काही खास टिप्स...

ठळक मुद्देमच्या केसांचा आणि स्किनचा कलर एकमेकांना सुटेबल ठरला तर तुमचे सौंदर्य अधिक उठून दिसू शकते. पण यात जर गल्लत झाली तर मात्र आपले सारे व्यक्तिमत्त्वच मार खाते.

बऱ्याचदा आपण कुणाचा तरी हेअर कलर पाहिलेला असतो. आपल्याला तो खूप आवडतो. म्हणून आपण आपल्याही केसांवर तोच कलर ट्राय करतो. पण अनेकदा काय होतं की आपला हा बेत पुरता फसलेला असतो. आपले भलत्याच रंगाने रंगलेले केस पाहून नेमका हाच रंग आपण निवडला होता का, असाही प्रश्न पडतो. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तुमचा स्किन टोन. उदाहरणार्थ बरगंडी रंग गोऱ्या मुलींना चांगला दिसतो. पण तो तितकाच चांगला सावळ्या रंगाच्या मुलींनाही दिसेल, असे काही नसते.

 

म्हणूनच स्किनटोननुसार हेअर कलर निवडणे खूप गरजेचे आहे. कारण तुमच्या केसांचा आणि स्किनचा कलर एकमेकांना सुटेबल ठरला तर तुमचे सौंदर्य अधिक उठून दिसू शकते. पण यात जर गल्लत झाली तर मात्र आपले सारे व्यक्तिमत्त्वच मार खाते. अनेकदा चेहऱ्याचा आकार, तुमचे वय, केसांची लांबी आणि स्टाईल यावरूनही केसांचा रंग ठरतो. पण हेअर कलर निवडताना सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते तुमच्या स्किनटोनला.

 

तुमचा स्किनटोन कसा आहे वार्म की कुल ?यावरही तुमच्या हेअर कलरची निवड अवलंबून असते. तुमचा स्किन टोन वार्म आहे की कुल हे ठरविण्याची एक पद्धत आहे. जर सुर्यप्रकाशात गेल्यावर तुम्ही गुलाबी होत असाल तर तुमचा स्किन टोन कुल आहे. तसेच जर सुर्यप्रकाशात गेल्यावर तुमची त्वचा टॅन होत असेल, तर तुमचा स्किनटोन वार्म आहे, हे ओळखावे. 

कोणता रंग कोणी निवडावा ? नॅचरल हेअर कलरहा रंग बहुतांश भारतीय लोकांच्या स्किनटोनला सुटेबल असतो. वार्म आणि कुल अशा दोन्ही स्किनटोन प्रकारासाठी हा कलर योग्य आहे. वय जास्त असलेल्या महिलांनाही हा कलर वापरण्याचे सुचविले जाते.

 

बरगंडी हेअर कलरहा कलर बहुतांश लोकांच्या आवडीचा आहे. जर तुम्ही वार्म टोनचे आहात तर तुम्ही बरगंडी रंगातील चॉकलेट ब्राऊन, ॲश ब्राऊन हे रंग निवडू शकता. तुमचा स्किन टोन कुल असल्यास महोगनी आणि चेस्टनट हे दोन हेअरकलर तुमच्यावर अधिक खुलतील.

 

रेड कलरया हेअर कलरची निवड अत्यंत सावधपणे करणे गरजेचे आहे. कारण जरा जरी गडबड झाली तरी तुमचा लूक खूपच जास्त विचित्र दिसू शकतो. अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिने सध्या तिचा हेअर कलर रेड केला आहे. यावर तिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट आल्या आहेत. जर तुम्ही खूप गोऱ्या आहात तरच तुम्ही या रंगाच्या वाट्याला जा आणि त्यातला लाईट रेड किंवा कॉपर रेड हा शेड निवडा. जर तुम्ही ऑलिव्ह स्किनटोनचे असाल तर ब्लू बेस रेड कलर निवडावा. 

 

फंकी हेअर कलरजर तुमचा लूक नेहमीच बोल्ड असेल तर तुम्ही हा रंग निवडू शकता. फंकी हेअर कलरमध्ये ग्रीन, पर्पल, ब्लू, पिंग असे रंग येतात. फंकी हेअर कलर लावल्यानंतर आपण तो किती आत्मविश्वासाने कॅरी करतो, याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे नेहमीच स्टाईलिश आणि बोल्ड लूकला प्राधान्य देणाऱ्या मुलींनीच या रंगाची निवड करावी. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी