Join us  

रात्री केस मोकळे सोडून झोपावे की वेणी घालणंच योग्य ? केसांसाठी बेस्ट पर्याय कोणता, कशाने केस जातात बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 3:55 PM

Which Hairstyle is Best for Sleeping : Is it better to sleep with hair tied or loose : केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकविण्यासाठी केस बांधून झोपावे की मोकळे ठेवावेत यांतील नेमके काय करावे ते पाहूयात.

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळच नसतो. याचा परिणाम आपले केस, त्वचा आणि एकूणच संपूर्ण शरीरावर दिसून येतो. आपले केस, सुंदर, घनदाट, मजबूत, लांबसडक असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. परंतु केसांचे आरोग्य व केसांची योग्य निगा राखली तरच आपल्या केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते. यासाठी केसांची वेळोवेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते(Which Hairstyle is Best for Sleeping).

केसांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून केसांना तेल लावणे, केस धुणे, योग्य आहार घेणे यांसारख्या गोष्टी महत्वाच्या असतात. प्रत्येकाची केस बांधण्याची पद्धत ही वेगळी असते. कुणी वेणी बांधतात तर कुणी अंबाडा तर कुणी केस मोकळे ठेवतात. दिवसभरात आपण केसांना वेगवेगळ्या पद्धतींनी बांधतो. परंतु रात्री झोपताना केस बांधून झोपावे की मोकळे (Should I Leave My Hair Open Or Tie It Up While I Sleep) सोडून असा प्रश्न कित्येकांच्या मनात येतो. अशा परिस्थितीत, केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी केस बांधून झोपावे की मोकळे ठेवावेत यांतील नेमके काय करावे ते पाहूयात(How to Tie Hair While Sleeping). 

केस मोकळे सोडून झोपावे की बांधून ? 

काहीजणी केस बांधून झोपतात तर काहीजणींना केस मोकळे ठेवून झोपण्याची सवय असते. परंतु तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती केस मोकळे सोडून झोपते तेव्हा केसांच्या बाबतीत अनेक लहान मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. लांब केस असणाऱ्यांनी जर केस मोकळे सोडले तर रात्रभरात केसांचा गुंता होऊ शकतो. सकाळी उठून आपल्याला आधी केसांचा गुंता सोडवावा लागतो. तसेच वारंवार केसांचा गुंता झाल्यामुळे केस तुटण्याची किंवा वगळण्याची समस्या अधिक वाढते. त्यामुळे शक्यतो केसांची सैल वेणी किंवा केस सैलसर बांधून झोपावे. 

केसांची देखभाल करायलाच वेळ नाही, घ्या हे ६ सुपर हॅक्स- एका मिनिट वेळ दिला तरी केस होतील सुंदर...

केस बांधून झोपल्याचे फायदे आणि नुकसान... 

१. केस बांधून झोपल्याने केसांचा फारसा गुंता होत नाही. सकाळी उठल्यानंतर केसांचा गुंता न झाल्यामुळे केस विंचरणे सोपे जाते. उशीवर केस घासून ते अधिक ड्राय होऊ शकतात. त्यामुळे केस बांधून झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे. 

२. केस बांधून झोपल्याने स्कॅल्पची त्वचा ओढली जाते. यामुळे स्कॅल्पसंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर केस बांधण्यासाठी रबर बँडचा वापर केल्याने केस तुटू शकतात. 

आंघोळ केल्यावर डोळे लालबुंद होतात ? ही असू शकतात कारणं, करा सोपे ४ उपाय... 

केस मोकळे ठेवून झोपण्याचे फायदे आणि नुकसान... 

१. केस मोकळे ठेवून झोपल्याने केसांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. यामुळे केस तुटण्याची आणि खराब होण्याची शक्यता फारच कमी होते.

२. लांब केस मोकळे ठेवून झोपल्याने त्याचा फार मोठा प्रमाणांत गुंता होतो. यामुळे सकाळी हा गुंता सोडवणे म्हणजे एक मोठी समस्या होऊन बसते, त्याचबरोबर हा गुंता सोडवताना केस तुटण्याचे प्रमाण हे अधिक असते. 

केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्हींचे पोषण देणारा आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय... 

केस बांधून झोपावे की सोडून यातील उत्तम पर्याय कोणता ? 

तुमच्या केसांचा प्रकार कोणता व केस हाताळण्याच्या तुमच्या पद्धती, केसांची ठेवणं यावर हे अवलंबून आहे. जर तुमचे केस लांब आणि दाट असतील तर झोपण्यापूर्वी केसची सैल वेणी घालणे फायदेशीर ठरू शकते. त्याचवेळी, जर तुमचे केस लहान किंवा पातळ असतील तर ते मोकळे सोडणे अधिक फायदेशीर ठरेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी