Join us  

रोज गळून गळून डोक्यावरचे केस गेले? आठवड्यातून एकदा लावा ३ प्रकारचे तेल, केस वाढतील भराभर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 1:51 PM

Which is Best Hair Oil for Long Hairs : तणावामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो.

केस तुटणं, वाढ न होणं या सध्याच्या कॉमन समस्या आहेत.  केस वाढवण्यासाठी नेहमीच बाजारातील शॅम्पूचा वापर केला जातो. पण त्याचा केसांवर कितपत उपयोग होईल याबाबत कल्पना नसते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तेलाने मालिश केली जाते. (Hair oil for long hair) केसांची तेलानं मसाज केल्यानं मूळं मजबूत होतात आणि भरपूर फायदे मिळतात. केसांची व्यवस्थित वाढ का होत नाही ते पाहूया. (Which is Best Hair Oil for Long Hairs)

१) ताणतणावामुळे शरीराला वेगवेगळ्या प्रोब्लेम्सचा सामना करावा लागतो. तणावामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. स्ट्रेस घेतल्यामुळे टेलोजन एफ्लुवियम ट्रिगर होतो. यामुळे केस टेलोजन फेजमध्ये जातात आणि केसांची वाढ ३० टक्क्यांनी थांबते. 

२) केसांना फाटे फुटल्यामुळेही केस लांब होत नाही आणि केस कोरडे होण्याची समस्या होते. केसांना पुरेश्या प्रमाणात न्युट्रिएंट्स मिळत नाही आणि केसाचं मॉईश्चर लेव्हल बॅलेन्स राहत नाही. ज्यामुळे स्पिल्ट एंड्स होतात यासाठी नियमित स्वरूपात ट्रिमिंग करायला हवं. 

३) योग्य आहार घ्या जेणेकरून केसांचा विकास होईल. केसांना पोषक तत्वांची आवश्यकता असते आहारातून केसांना पोषक तत्व मिळतात.

४) केसांची योग्य काळजी न केल्यास  ते लांब होत नाहीत. यासाठी केस व्यवस्थित धुवा. हिट प्रोडक्ट्सचा कमी वापर करा आणि केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करू नका. यामुळे केसाचं नुकसान होतं.

५)  आहार व्यवस्थित न घेतल्यास केसांचा व्यवस्थित विकास होत नाही. केसांना आवश्यक पोषक तत्वाची आवश्यकता असते, ती आहारातून मिळते.  हिट प्रोडक्टस आणि केमिकल्सचा जास्त वापर केसांवर करू नये.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोणतं तेल वापरायचे?

रोजमेरी ऑईल

रोजमेरी तेलात जोजोबा ऑईलचे काही थेंब मिसळा. नंतर या तेलाने केसांची मसाज करा. स्काल्पवर तेल लावायला विसरू नका. आठवड्यातून २ ते ३ वेळा रोजमेरी तेलाने मसाज करा यामुळे केस लांब होतील. शॅम्पूमध्ये रोजमेरी ऑईलचे काही थेंब मिसळून तुम्ही हेअर वॉश करू शकता. याव्यतिरिक्त कंडिशनरमध्येही हे तेल  मिसळा.

नारळाचे तेल

केसांना नारळाचं तेल लावल्यानं पटापट केस वाढतात. यासाठी हॉट ऑईल थेरेपी घ्यायला हवी. मसाज केल्यामुळे केसाच्या फॉलिकल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. फिंगर टिप्सच्या मदतीनं केसंना तेल लावून मसाज करा आणि एक टॉवेल गरम पाण्यात भिजवून तो टॉवेल केसांभोवती गुंडाळा. जवळपास ५ मिनिटं ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. ३ ते ४ वेळा ही प्रोसेस करा. असं केल्यानं स्काल्पमध्ये तेल व्यवस्थित शोषलं जाईल.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल स्किन आणि केसांसाठी फायदेशीर ठरतं. या तेलात भरपूर एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. यामुळे हेअर डॅमेज होत नाहीत.  केसांना ऑलिव्ह ऑईल वापरल्याने वेगळी शाईन येते.  ज्यामुळे केस तुटत नाहीत. आठवड्यातून २ वेळा अंघोळ करण्याआधी केसांना ऑलिव्ह ऑईल लावा. काही महिन्यात तुम्हाला केसांमध्ये वाढ झालेली दिसून येईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स