Lokmat Sakhi >Beauty > मुलांचे केस खूपच पातळ आहेत- वाढतही नाहीत? जावेद हबीब सांगतात 'हे' तेल लावा, दाट होतील

मुलांचे केस खूपच पातळ आहेत- वाढतही नाहीत? जावेद हबीब सांगतात 'हे' तेल लावा, दाट होतील

Which Is The Best Hair Oil For Kids: मुलांचे केस खूप पातळ असतील तर त्यांच्या केसांना कोणतं तेल लावावं, याविषयी सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिलेली ही माहिती पाहा...(which oil is good for kids hair growth?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 09:13 AM2024-09-24T09:13:41+5:302024-09-24T09:15:01+5:30

Which Is The Best Hair Oil For Kids: मुलांचे केस खूप पातळ असतील तर त्यांच्या केसांना कोणतं तेल लावावं, याविषयी सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिलेली ही माहिती पाहा...(which oil is good for kids hair growth?)

which is the best hair oil for kids, which oil is good for kids hair growth, best hair oil for kids | मुलांचे केस खूपच पातळ आहेत- वाढतही नाहीत? जावेद हबीब सांगतात 'हे' तेल लावा, दाट होतील

मुलांचे केस खूपच पातळ आहेत- वाढतही नाहीत? जावेद हबीब सांगतात 'हे' तेल लावा, दाट होतील

Highlightsमुलांच्या केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर त्यावर काय उपाय करावा, याविषयीची माहिती.....

हल्ली केसांच्या तक्रारी तर बऱ्याच लोकांच्या आहेत. त्याला लहान मुलंही अपवाद नाहीत. बऱ्याचदा आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही. मुलं फळं, भाज्या असे पौष्टिक पदार्थ खायला टाळाटाळ करतात. जंकफूड खाण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे मग तब्येतीवर परिणाम होतो आणि केसांच्या वाढीवर, केसांच्या आरोग्यावरही तो दिसून येतो. हल्ली तर लहान मुलांचे केसही पांढरे झाल्याचं दिसून येतं. म्हणूनच मुलांच्या केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर त्यावर काय उपाय करावा (best hair oil for kids), याविषयीची माहिती सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब (Javed Habib) यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे. (which oil is good for kids hair growth?)

 

मुलांच्या केसांना कोणतं तेल लावावं?

मुलांच्या केसांसाठी बदामाचं तेल उत्तम आहे, असं जावेद हबीब सांगतात. त्यामुळे मुलांच्या केसांना शक्यतो बदामाचं तेल लावूनच हलक्या हाताने मालिश करावी. 

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

आठवड्यातून २ वेळा तुम्ही मुलांच्या केसांना बदाम तेल लावून मालिश करू शकता. त्यानंतर एखाद्या तासाने लहान मुलांसाठी असणारा कोणताही माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाकावेत.

तसेच मालिश करताना केस खूप जोरजोरात चोळू नका. बोटांची समोरची टोके गोलाकार फिरवत हळूवार हाताने मसाज करा.

 

बदाम तेल कसं तयार करावं?

केसांना लावण्यासाठी तुम्ही विकत मिळणारं बदाम तेलही आणू शकता किंवा मग घरच्याघरी बदाम तेलही करू शकता.

पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

बदाम तेल करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीनुसार बदाम ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्या. यानंतर बदामाचं जे दूध तयार होईल ते कढईमध्ये टाकून उकळून घ्या. हळूहळू दुधापासून पांढरट घट्ट पदार्थ तयार होईल. त्यानंतर त्या पदार्थाचा रंग तपकिरी होऊन त्याला तेल सुटू लागलं की गॅस बंद करा. यानंतर ते सगळं मिश्रण थोडं थंड झालं की एका कपड्यात टाकून त्यातलं तेल गाळून घ्या. हे अगदी शुद्ध बदाम तेल आहे, पण ते खूपच कमी प्रमाणात होतं.


 

त्यामुळे या दुसऱ्या पद्धतीनेही तुम्ही बदामाचं तेल तयार करू शकता. त्यासाठी साधारण अर्धी वाटी बदाम असतील तर १ वाटी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घ्या. बदाम भिजवून त्याची पेस्ट तयार करा आणि ती तेलामध्ये उकळून घ्या. यानंतर ते तेल गाळून घ्या. या तेलाने केसांना मसाज करा. 

 

Web Title: which is the best hair oil for kids, which oil is good for kids hair growth, best hair oil for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.