Lokmat Sakhi >Beauty > केसांना कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती? १ खास ट्रिक, केस होतील मऊ- चमकदार 

केसांना कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती? १ खास ट्रिक, केस होतील मऊ- चमकदार 

Which Is The Best Method For Applying Aloe Vera To Hair: केसांसाठी कोरफड चांगली असते हे आपल्याला माहिती आहे. पण केसांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी तिचा वापर नेमका कसा करावा?(benefits of aloe vera to hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 05:14 PM2024-07-23T17:14:17+5:302024-07-23T17:26:59+5:30

Which Is The Best Method For Applying Aloe Vera To Hair: केसांसाठी कोरफड चांगली असते हे आपल्याला माहिती आहे. पण केसांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी तिचा वापर नेमका कसा करावा?(benefits of aloe vera to hair)

which is the best method for applying aloe vera to hair, how to apply aloe vera to hair, benefits of aloe vera to hair | केसांना कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती? १ खास ट्रिक, केस होतील मऊ- चमकदार 

केसांना कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती? १ खास ट्रिक, केस होतील मऊ- चमकदार 

Highlightsकेसांसाठी कोरफड फायदेशीर आहे, हे आपण जाणतो. पण तिचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, हे आपल्याला माहिती नसते.

केसांमध्ये कोंडा होणे, केसांची वाढ खुंटणे, केस खूप कोरडे पडणे, केसांना फाटे फुटणे, केस खूप गळणे अशा  केसांच्या बाबतीत अनेक समस्या बहुतांश लोकांना आहे. या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे कॉस्मेटिक्स आणतो. पण या बहुतांश समस्या कमी करणारा एक स्वस्तात मस्त उपाय विसरून जातो. बऱ्याच लोकांच्या अंगणात, टेरेसमध्ये वाढणारी कोरफड केसांच्या बाबतीतल्या या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. केसांसाठी कोरफड फायदेशीर आहे, हे आपण जाणतो (which is the best method for applying aloe vera to hair). पण तिचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, हे आपल्याला माहिती नसते. (benefits of aloe vera to hair)

 

केसांसाठी कोरफडीचा कसा वापर करावा?

कोरफडीमध्ये असणाऱ्या पोषक घटकांचा केसांसाठी अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर तिचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. तो नेमका कसा करायचा ते आता पाहा..

सगळ्यात आधी तर तुमच्याकडे असणारी कोरफड तोडून घ्या. तुमचे केस किती लांब आहेत यावरून किती कोरफड लागू शकेल याचा अंदाज घ्या.

तुम्हाला माहिती आहे का झाडूमध्ये किती कॅलरी, फॅट्स असतात? बघा मजेशीर व्हायरल फोटो 

त्यानंतर कोरफडीचं पान मधोमध कापा आणि सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने तिच्या आतला पांढरा पारदर्शक गर काढून घ्या. 

हा गर मिक्सरमधून फिरवून त्याची एकसमान पेस्ट करून घ्या. त्यामध्ये थोडं खोबरेल तेल किंवा कॅस्टर ऑईल टाका. आता हे मिश्रण हळूवार हाताने मालिश करत केसांच्या मुळाशी चोळा. तसेच केसांच्या लांबीवरही लावा. 

यानंतर साधारण एका तासाने एखादा माईल्ड शाम्पू वापरून नेहमीप्रमाणे केस धुवून टाका. केसांना कोरफड लावण्याची ही एक उत्तम पद्धत मानली जाते.

 

केसांना कोरफडीचा गर लावण्याचे फायदे

१. कोरफड हे नॅचरल कंडिशनर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तुमच्या कोरड्या पडलेल्या केसांना मऊ, चमकदार करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे.

वजन कमी करायचं म्हणून पोळ्या कमी खाता? त्यापेक्षा 'हा' पदार्थ खा, मधुमेहसुद्धा राहील कंट्रोलमध्ये

२. कोरफडीमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाणही कमी होतं.

३. डोक्याच्या त्वचेची म्हणजेच स्काल्पची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते. त्यामुळे केसांमधला कोंडा, स्काल्पला येणारी खाज कमी होते. कोंडा कमी झाला की आपोआपच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे केस दाट आणि लांब होतात. 
 

Web Title: which is the best method for applying aloe vera to hair, how to apply aloe vera to hair, benefits of aloe vera to hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.