Lokmat Sakhi >Beauty > अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

Diwali Special : Best oil to use for Abhyanga : अभ्यंगस्नानासाठी कोणते तेल व ते कसे वापरावे हा प्रश सगळ्यांनाच पडतो, यासाठी एक उत्तम उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 02:24 PM2023-11-10T14:24:13+5:302023-11-10T14:39:50+5:30

Diwali Special : Best oil to use for Abhyanga : अभ्यंगस्नानासाठी कोणते तेल व ते कसे वापरावे हा प्रश सगळ्यांनाच पडतो, यासाठी एक उत्तम उपाय...

Which oil is used in abhyanga massage, How to perform a self-massage or Abhyanga with oil | अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

दिवाळी (Diwali 2023) हा सगळ्यांच्याच आवडीचा सण. दिवाळी म्हटल की रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ हे सगळेच आले. परंतु याबरोबरच दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला (Diwali 2023 Abhyanga Snan ) भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. पहाटे उठून अंगाला तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे(Best oil to use for Abhyanga).

साधारणपणे सगळीकडे अभ्यंगस्नान करण्याची एकच पद्धत आहे. लहान मुलांना तर अगदी हमखास साग्रसंगीत अभ्यंगस्नान घालते जाते. सगळ्यात आधी शरीराला तेलाने मालिश केले जाते. तेल शरीरात छान मुरल्यानंतर मग त्यावर छान सुगंधी उटणं लावलं जातं. त्यानंतर सुगंधी साबण लावून मस्त गरम पाण्याने आंघोळ केली जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी केल्या जाणाऱ्या अभ्यंगस्नानात सुगंधी तेल व उटणं याला फार महत्व असते. तेलाची मालिश केल्यामुळे आपल्या शरीराला काम करुन आलेला थकवा दूर होतो, याचबरोबर अनेक फायदेही मिळतात. परंतु अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल कसे वापरावे ? याची योग्य पद्धत देखील माहित असणे गरजेचे असते(Which oil is used in abhyanga massage)     

अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? 

अभ्यंगस्नानासाठी आपण वेगवेगळ्या तेलांचा वापर करु शकतो. आर्युवेदाप्रमाणे तेल शरीरात जिरवणे आणि उटणं लावून अंगाची स्वच्छता करणे, गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.अभ्यंगस्नानाची पद्धत ही दर मैलावर बदलत असली तरी देखील त्याचा उद्देश हा शरीराचे शुद्धीकरण करणे असा होतो. अभ्यंगस्नानासाठी आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या तेलांचा वापर करु शकतो. तेलाचा विचार कराल तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींच्या तेलाचा वापर केला जातो. काही ठिकाणी तिळाचे तेल, काही ठिकाणी खोबऱ्याचे तेल अशा तेलांचा वापर शरीरासाठी केला जातो. वेगवेगळ्या भागानुसार अभ्यंगस्नानाच्या पद्धती बदलत असल्या, त्याचे घटक बदलत असले तरीदेखील त्याचे फायदे तितकेच वाढत राहतात. असे असले तरीही अभ्यंगस्नानासाठी तिळाचे तेल वापरणे हे अधिक जास्त फायदेशीर ठरते. 

सणासुदीसाठी मेकअप करताना ४ सोप्या स्टेप्समध्ये फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा दिसेल उजळ...

अभ्यंगस्नानासाठी तिळाचेच तेल का वापरावे ? 

तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स, ओमेगा - ६, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात बरेचदा त्वचा कोरडी पडते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी असा दोन्ही प्रकारे फायदा होतो. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप फायदा होतो. आठवड्यातून किमान २ वेळा तरी आंघोळीला जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा मसाज संपूर्ण शरीराला करावा. तिळाचं तेल गरम असल्याने त्याने शरीराला मसाज केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. याचबरोबर  त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी एक उत्तम तेल म्हणून तिळाचे तेल ओळखले जाते. 

सुगंधी - शाही उटणं घरच्याघरी करण्याची घ्या सोपी कृती, बाजारातलं उटणं विसराल इतके सुंदर...

अभ्यंगस्नानासाठी तिळाचे तेल गरम करण्याची योग्य पद्धत :- 

अभ्यंगस्नानासाठी तेल गरम करुन वापरले तर त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. यासाठीच अभ्यंगस्नानासाठी तेल वापरताना ते नेहमी गरम करुनच वापरावे. तेल गरम करताना आपण शक्यतो ते एका वाटीत घेऊन डायरेक्ट गॅसवर ठेवून गरम करतो, परंतु असे करणे चुकीचे आहे. तेल गरम करताना ते विशिष्ट पद्धतीनेच गरम केले पाहिजे. तेल गरम करताना जर ते थेट गॅसवर गरम केले तर ते तेल करपून जाण्याची किंवा जळण्याची शक्यता असते.  अभ्यंगस्नानासाठी वापरले जाणारे तेल हे नेहमी गरम करूनच आपल्या त्वचेवर लावावे. जर आपण अभ्यंगस्नानासाठी वापरले जाणारे तेल हे गरम न करता तसेच वापरले तर ते आपल्या त्वचेत खोलवर मुरत नाही. हे तेल आपल्या त्वचेत खोलवर पोहोचवण्यासाठी ते कोमट गरम करणे गरजेचे असते. 

चुकूनही गुलाब पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू नका, ऐन दिवाळीत चेहरा होईल निस्तेज आणि खरखरीत...

तेल गरम करताना ते थेट गॅसवर ठेवून गरम न करता एका सोप्या पद्धतीचा वापर आपण करु शकतो. एका मोठ्या बाऊलमध्ये थोडे उकळते गरम पाणी घेऊन ते ओतावे. एका छोट्या वाटीत अभ्यंगस्नानासाठी लागेल इतके तेल घ्यावे, आता या गरम पाणी ओतलेल्या बाऊलमध्ये ही तेलाची वाटी १० ते १५ मिनिटे ठेवून द्यावी. बाहेरील गरम पाण्याच्या उष्णतेने वाटीतील तेल कोमट गरम होण्यास मदत होईल. असे कोमट गरम झालेले तेल अभ्यंगस्नानासाठी वापरावे.

Web Title: Which oil is used in abhyanga massage, How to perform a self-massage or Abhyanga with oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.