Join us  

आपल्या त्वचेसाठी कोणता स्क्रब परफेक्ट आहे? सॉल्ट स्क्रब की शुगर स्क्रब? - कसं ठरवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 4:28 PM

Beauty tips: डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमितपणे स्क्रब केलं पाहिजे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण आपल्या त्वचेसाठी कोणतं स्क्रब (scrub) योग्य हे कसं ओळखायचं? त्यासाठीच वाचा या काही टिप्स..

ठळक मुद्दे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी सॉल्ट स्क्रब करू नये. ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी सॉल्ट स्क्रब उत्तम मानलं जातं. 

चेहरा किंवा अंगावरची त्वचा नितळ करण्यासाठी किंवा काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी नियमितपणे स्क्रब करावं लागतं.. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा स्वच्छ, नितळ होते. घरच्या घरी स्क्रब करायचं असेल तर त्यासाठी अनेक घरगुती पर्याय उपलब्ध आहेत. शुगर स्क्रब आणि सॉल्ट स्क्रब हे त्याचे स्क्रब करण्याचे दोन मुख्य प्रकार. यापैकी कोणता प्रकार आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे, हे ओळखता आलं तर स्क्रबिंग (how to choose scrub according to skin tone?) करण्याचा आणखी चांगला परिणाम त्वचेवर दिसून येऊ शकतो.

 

शुगर स्क्रब म्हणजे काय (what is sugar scrub)?नावावरूनच आपल्याला हे स्पष्ट होतं की शुगर स्क्रब म्हणजे त्यामध्ये साखरेचा अंश असणार. आपल्या स्वयंपाक घरातील साखरेला विविध पदार्थांसोबत मिक्स करून आपल्याला घरच्याघरी उत्तम प्रकारचं शुगर स्क्रब बनवता येतं. साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असतं हे ॲसिड कोरड्या, रुक्ष, डल आणि डिहायड्रेट झालेल्या त्वचेवर खूप चांगल्या प्रकारे परिणाम घडवून आणतं. त्यामुळे ज्यांची त्वचा कोरडी आहे, अशा लोकांसाठी शुगर स्क्रब करणं फायद्याचं ठरतं. साखरेला विविध प्रकारच्या तेलासोबत किंवा फळांच्या रसासोबत मिक्स करून शुगर स्क्रब घरच्याघरी बनवता येतं. साखर, कॉफी आणि मध एकत्र करून लावणं हे देखील घरच्या घरी तयार होणारं एक उत्तम शुगर स्क्रब आहे. 

 

सॉल्ट स्क्रब म्हणजे काय (what is salt scrub)? सी सॉल्ट आणि एप्सम सॉल्टचा वापर करून सॉल्ट स्क्रब बनिवण्यात येतं. बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्याची क्षमता सॉल्ट स्क्रबमध्ये अधिक असते. त्यामुळे बॉडी स्पा ट्रिटमेंट करतानाही त्यात सॉल्ट स्क्रब वापरलं जातं. स्नायुंना रिलॅक्स करण्यासाठी सॉल्ट स्क्रब अधिक प्रभावी ठरतं. चारकोलसोबत सॉल्ट स्क्रब वापरता येतं. त्याशिवाय नारळाचं तेल किंवा कोणतेही इसेंशियल ऑईल टाकून आपण सॉल्ट स्क्रब केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. त्वचेला मुलायम करण्याचं काम सॉल्ट स्क्रब करतं. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी सॉल्ट स्क्रब करू नये. ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी सॉल्ट स्क्रब उत्तम मानलं जातं. 

  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी