माझी त्वचा खूप ऑयली आहे, कोणता फेस वॉश वापरावा कळत नाही. कितीही धुतला तरी चेहरा तेलकट दिसतो, त्यावर उपाय काय?
प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. कोणाची त्वचा तेलकट असते तर कोणाची कोरडी. काहीजणांच्या त्वचेतून सतत तेल बाहेर येतं. त्वचेतून बाहेर येत असलेल्या सीबममुळे त्वचा मॉईश्चराईज राहते. पण काहीजणांच्या त्वचेच सिबमचं उत्पादन जास्त होतं. त्यामुळे त्वचा तेलकट होते. तेव्हा त्वचेच्या ग्रंथी जास्तीत जास्त सिबम तयार करतात तेव्हा पोर्स बंद करतात आणि पिंपल्स यायला सुरूवात होते. त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. (Best Face Washes for Oily Skin)
त्वचा वारंवार तेलकट होणं हा कोणताही त्रास नसून एक स्किन टाईप आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्वचेच्या टाईपनुसार फेसवॉशची निवड करायला हवी. खासकरून तेलकट त्वचा असल्यांनी विचार करून फेसवॉश निवडावा. (3 Best Face Washes for Oily Skin)
१) फोमिंग फेसवॉश
फॉर्म बेस्ड फेस वॉश चेहऱ्यावरील सर्व घाण सहज काढून टाकतात. यामुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाण, प्रदूषण आणि अतिरिक्त तेल सहज साफ करता येते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकल्यास मुरुम, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्याही कमी होते. अगदी थोड्या प्रमाणात फोमिंग फेस वॉश देखील चांगले परिणाम देऊ शकतो. फोमिंग फेस वॉश तेलकट त्वचा असलेल्या सर्व महिला आणि पुरुष वापरू शकतात.
२) लोशन बेस्ड फेसवॉश
तेलकट त्वचेसाठी लोशन बेस्ड फेसवॉश देखील चांगला पर्याय आहे. या फेश वॉशमध्ये तेल अजिबात नसते, ज्यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका होऊ शकते. यामुळे त्वचेतील तेल शोषले जाते आणि त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणून रोज लोशनबेस्ड फेसवॉश वापरणं टाळावं.
३) जेल बेस्ड फेसवॉश
जर तुमची तेलकट त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल बेस्ड फेस वॉश वापरू शकता. जेल बेस्ड फेस वॉश वापरल्याने तेलकट त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाते आणि मुरुम, ब्लॅकहेड्स इत्यादीपासून मुक्ती मिळते. जेल फेस वॉश वापरणे तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी चांगले सिद्ध होऊ शकते. जेल बेस्ड फेस वॉश वापरल्याने तुमच्या तेलकट त्वचेशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात