Lokmat Sakhi >Beauty > Which Type Of Nail Paint Is Best : तुम्ही लावताय ती नेलपेंट लोकल आहे की ब्रँडेड? या ट्रिक्स वापरून विकत घ्या उत्तम नेलपेंट्स

Which Type Of Nail Paint Is Best : तुम्ही लावताय ती नेलपेंट लोकल आहे की ब्रँडेड? या ट्रिक्स वापरून विकत घ्या उत्तम नेलपेंट्स

Which Type Of Nail Paint Is Best :मेकअप लावण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ब्रशच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता, त्याचप्रमाणे नेलपॉलिशचा दर्जाही खूप महत्त्वाचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:18 PM2022-06-07T15:18:19+5:302022-06-07T15:41:02+5:30

Which Type Of Nail Paint Is Best :मेकअप लावण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ब्रशच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता, त्याचप्रमाणे नेलपॉलिशचा दर्जाही खूप महत्त्वाचा आहे.

Which Type Of Nail Paint Is Best : How to differentiate between local and branded nail polish | Which Type Of Nail Paint Is Best : तुम्ही लावताय ती नेलपेंट लोकल आहे की ब्रँडेड? या ट्रिक्स वापरून विकत घ्या उत्तम नेलपेंट्स

Which Type Of Nail Paint Is Best : तुम्ही लावताय ती नेलपेंट लोकल आहे की ब्रँडेड? या ट्रिक्स वापरून विकत घ्या उत्तम नेलपेंट्स

सर्वसाधारणपणे महिलांना त्यांच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल आर्ट करायला आवडते आणि त्यासाठी नखांवर विविध प्रकारचे नेल पेंट लावतात. पण अनेक वेळा असे घडते की नेलपेंट घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात तरी मनासारखी नखं दिसत नाही. लोकल आणि ब्रँडेड नेल पेंटमध्ये मोठा फरक आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या नेल आर्टवरही होतो. त्यामुळे सुंदर नेल आर्ट डिझाइनसाठी चांगल्या दर्जाचे नेलपेंट घेणे योग्य ठरते. (How to differentiate between local and branded nail polish)

ब्रशची गुणवत्ता

मेकअप लावण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ब्रशच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता, त्याचप्रमाणे नेलपॉलिशचा दर्जाही खूप महत्त्वाचा आहे. साधारणपणे ब्रँडेड नेलपॉलिशचा ब्रश पुरेसा मोठा असतो. यामुळे नखांवर पॉलिश तितकीच चांगली दिसते, ज्यामुळे तुमचे  मॅनिक्युअर चांगले होते. म्हणून, नेल पेंट खरेदी करण्यापूर्वी, नेहमी आपल्या नखांवर एकदा लावून पाहा. यावरून तुम्हाला ब्रशच्या गुणवत्तेची कल्पना येईल.

 चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डागही पडलेत? 'या' पद्धतीनं ॲलोवेरा आईस क्यूब लावा, कायम दिसेल ग्लोईंग चेहरा

सामान्यतः असे आढळून येते की स्वस्त नेल पॉलिश ब्रँडेड नेल पॉलिशपेक्षा जाड असतात, याचा अर्थ ती सुकायला जास्त वेळ लागतो. अशा  स्थितीत, तुम्ही लोकल नेलपॉलिश निवडल्यास, ते लावल्यानंतर तुम्हाला ते सुकण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. यामुळे मॅनिक्युअरची प्रक्रिया वेळखाऊ बनेल.

ब्रँडेड नेल पेंट्स खरेदी करण्यासाठी सामान्यतः महिलांना फारसा पैसा खर्च करावासा वाटत नाही. दुसरीकडे, लोकल नेल पेंट खूप स्वस्त असतात म्हणूनच त्यांना बहुतेकदा प्राधान्य दिले जाते. पण या दोघांच्या गुणवत्तेत मोठा फरक आहे. अशा स्थितीत स्वस्त नेलपॉलिश घेतल्यानंतर तुम्हाला ती पुन्हा पुन्हा घ्यावी लागेल.

वास्तविक, जर त्याची गुणवत्ता चांगली नसेल, तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लावावे लागेल, ज्यामुळे ती लवकर संपेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. याव्यतिरिक्त,  लोकल नेल पॉलिश थोडी जाड असते, ज्यामुळे ती कोरडी होण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते.

वयस्कर चेहऱ्याला तरूण बनवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले ६ उपाय; नेहमी दिसेल ग्लोईंग त्वचा

जेव्हा तुम्ही एखादे मेकअप उत्पादन पुन्हा पुन्हा खरेदी करता, तेव्हा तुम्हाला ते प्रत्येक वेळी सारखेच हवे असते. नेलपेंटचा विचार केला तर, तुम्ही लोकल आणि ब्रँडेड नेल पेंटमधील फरक सातत्याने पाहू शकता. वास्तविक लोकल नेल पेंटची सुसंगतता प्रत्येक वेळी सारखी नसते. इतकेच नाही तर त्यांच्या रंगाच्या शेडमध्येही फरक दिसेल. पण ब्रँडेड नेल पेंटच्या बाबतीत असं होत नाही. त्यामुळे ब्रँडेड नेल पेंट्समध्ये गुंतवणं कधीही उत्तम ठरेल. 
 

Web Title: Which Type Of Nail Paint Is Best : How to differentiate between local and branded nail polish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.