खूप केस पांढरे झालेत गं, तेल, शाम्पू किंवा हा हेअर टोनर वापरून पाहा'', असे सल्ले अनेक जणांना मिळाले असतील. परंतु, केस कमी वयात पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. एका विशिष्ट वयानंतर केस पांढरे होतात. पण कमी वयात जर केस पांढरे होत असतील, तर यामागे नक्कीच शरीरात पोषक तत्वांची कमतरता, यासह तणाव अशी कारणे असू शकतात. केसांना तेल लावून काळजी घ्यायलाच हवी, पण यासोबत आपण आहारात केसांना मिळेल अश्या पौष्टीक घटकांचा देखील समावेश करायला हवा. केस पांढरे होण्यामागे कोणत्या चुका करणे टाळायला हवे याबाबतीत पोषणतज्ज्ञ सिमरन कौर यांनी माहिती शेअर केली आहे(White hair: Causes and ways to prevent it).
संतुलित आहार
केस अकाली पांढरे होण्यामागे असंतुलित आहार कारणीभूत ठरू शकते. फास्ट फूडमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. शरीरात लोह, तांबे, मॅग्नेशियम आणि झिंकची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहार घ्या.
चेहऱ्यासाठी कच्चे दूध म्हणजे वरदान, २ चमचे दुधात मिसळा ३ गोष्टी, चेहरा करेल ग्लो
केसांवर हार्श केमिकल्सचा वापर करू नका
केस पांढरे झाल्यानंतर लोकं हेअर डाय किंवा हेअर कलरचा वापर करतात. यात अनेकदा केमिकल रसायनांचा वापर होतो. त्यामुळे नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा, केमिकल प्रॉडक्ट्स वापरणे टाळा.
केसांची मालिश करा
आयुर्वेदानुसार केसांना हलक्या हाताने तेल लावून चंपी करणं गरजेचं आहे. यामुळे रक्त प्रवाह आणि केसांची चांगली वाढ होते.
थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?
क्रोनिक स्ट्रेस कमी करा
केस अकाली पांढरे होण्यामागे मुख्य कारण म्हणजे तणाव. यामुळे त्वचेच्या पिगमेंटेशनची समस्या देखील उद्भवू शकते, यासह हार्मोनल असंतुलन देखील होते. स्ट्रेस दूर करण्यासाठी नियमित योग आणि मेडिटेशन करा.