Lokmat Sakhi >Beauty > White Hair Remedies : केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? फक्त १ उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर राहतील केस

White Hair Remedies : केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? फक्त १ उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर राहतील केस

White Hair Remedies : लोकांच्या मते पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाची सुरुवात. अनेक लोक आहेत, ज्यांना ही समस्या लहान वयातच सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:59 AM2022-03-29T11:59:32+5:302022-03-29T12:37:23+5:30

White Hair Remedies : लोकांच्या मते पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाची सुरुवात. अनेक लोक आहेत, ज्यांना ही समस्या लहान वयातच सुरू झाली आहे.

White Hair Remedies : Papaya leaf for grey hair know how to use for hair growth | White Hair Remedies : केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? फक्त १ उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर राहतील केस

White Hair Remedies : केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? फक्त १ उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर राहतील केस

आजकाल केस पांढरे (White hair problem) होण्याची समस्या तरुण वयातच दिसून येते. यामागील मुख्य कारण म्हणजे तणाव आणि वाईट जीवनशैली. ही समस्या सुरू होताच लोक अस्वस्थ होऊ लागतात. अनेकदा लोक ते पाहून त्यांची खिल्ली उडवू लागतात. (How to get black hairs naturally) लोकांच्या मते पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाची सुरुवात. अनेकांना ही समस्या लहान वयातच सुरू झालेली असते. (Hair Care Tips) हे टाळण्यासाठी बरेच लोक महागड्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु त्यामुळे लक्षणीय फरक जाणवत नाही. (Papaya leaf for grey hair know how to use for hair growth)

पपईच्या पानांचा वापर

पांढर्‍या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले पोषक घटक केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यासाठी प्रथम पपईचे पान तोडून बारीक चिरून घ्यावे. आता पेस्टमधून रस काढा आणि केसांना लावा. ते सुकल्यावर शॅम्पूच्या मदतीने केस धुवा. पपईची पानं लावल्यानं लवकरच तुमचे केस चमकदार, दाट दिसू लागतील.

केसांच्या वाढीसाठी पपईच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. वास्तविक, त्यात कार्पेन संयुगे असतात. हे अल्कलॉइड कंपाऊंड तुमच्या टाळूवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. इतकंच नाही तर ते नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते. केसांची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी तुम्ही हेअर पॅकमध्ये देखील वापरू शकता.

 पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय; वाचा पित्त झाल्यावर काय खायचं काय नाही

हिवाळ्याशिवाय उन्हाळ्यातही कोंड्याची समस्या असते. केस धुतल्यानंतर काही लोकांना याचा खूप त्रास जाणवतो. टाळूमध्ये सतत खाज सुटल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर पपईच्या पानांचा रस घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. आता ते केसांना लावा, अर्ध्या तासानंतर केस साध्या पाण्याने धुवा.

पपईच्या पानांशिवाय त्याची पेस्टही लावता येते. लिंबाचा रस आणि दही मिसळून तुम्ही हेअर पॅक तयार करू शकता. याशिवाय त्याचा रस टाळूवरही लावता येतो. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा ते लावा. हे मिश्रण सुकल्यानंतर केस व्यवस्थित धुवा. अर्धा तास किंवा 15 मिनिटांनी केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
 

Web Title: White Hair Remedies : Papaya leaf for grey hair know how to use for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.