आपण पाहतो की बहुतेक लोक केस गळणे आणि पांढरे होणे यामुळे त्रासलेले असतात. यामागे प्रदूषण, असंतुलित अन्न, झोपण्याची आणि उठण्याची चुकीची वेळ अशी अनेक कारणे आहेत. (White Hairs Solution) पण या सगळ्याशिवाय केसांची आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे कोंडा, ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि ते पांढरे होण्याबरोबरच गळू लागतात. (white hair baldness problem oil massage neem coconut sesame olive vitamin c black)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोंड्याची आणि पांढऱ्या केसांची समस्या टाळण्यासाठी 3 नैसर्गिक तेले खूप चांगले परिणाम देऊ शकतात. विशेष म्हणजे ही तेलं केस गळणे आणि पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे या नैसर्गिक तेलांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. हे तेल टाळूला कोरडे होण्यापासून तर वाचवतातच, पण आवश्यक पोषणही देतात. हे तेल दोन आठवडे वापरल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल.
उन्हामुळे चेहरा काळपट, निस्तेज दिसतोय? घरच्याघरीच आईस वॉटर फेशियलनं मिळवा ग्लोईंग, फ्रेश त्वचा
1) कडूलिंबाचं तेल
हे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम सुक्या कडुलिंबाची पाने बारीक वाटून घ्या. आता त्यात ऑलिव्ह ऑईल टाका. नंतर केसांच्या मुळांवर लावा. 1 ते 2 तासांनंतर शॅम्पूनं केस धुवा.या उपायामुळे कोंडा होणार नाही, केस गळणार नाहीत आणि पांढरेही होणार नाहीत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कडुलिंबाचे तेल हे असे नैसर्गिक तेल आहे, जे केसांचा कोरडेपणा दूर करते आणि केसांमधील कोंडा दूर करते.. कडुनिंबात अँटी फंगल गुणवत्ता असते, जी केसांना अनेक समस्यांपासून वाचवते.
२) नारळाचं तेल
प्रथम तुम्हाला खोबरेल तेल विकत घ्यावे लागेल. आता मेथी दाणे खोबरेल तेलात उकळा. आता त्यात कांद्याचा रस घाला. खोबरेल तेल सर्व ऋतूंमध्ये केसांना लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात.
३) तिळाचं तेल
आधी तिळाचे तेल घ्या. आता हे केसांना आठवड्यातून तीनदा चांगले लावा. काही दिवसांतच केसांच्या आरोग्यात फरक स्पष्टपणे दिसून येईल. तिळाच्या तेलात भरपूर फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो. या तेलामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए आणि सी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.