Lokmat Sakhi >Beauty > White Hair Solution At Home : केस फारच पांढरे व्हायला लागलेत? काळ्याभोर, दाट केसांसाठी सकाळ-संध्याकाळ करा फक्त १ सोपा उपाय

White Hair Solution At Home : केस फारच पांढरे व्हायला लागलेत? काळ्याभोर, दाट केसांसाठी सकाळ-संध्याकाळ करा फक्त १ सोपा उपाय

White Hair Solution At Home : अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेतल्यानंतरही केस चांगले दिसत नाही किंवा काहीवेळानंतर पुन्हा पांढरे दिसायला लागतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:24 AM2022-05-11T11:24:27+5:302022-05-13T14:03:57+5:30

White Hair Solution At Home : अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेतल्यानंतरही केस चांगले दिसत नाही किंवा काहीवेळानंतर पुन्हा पांढरे दिसायला लागतात. 

White Hair Solution At Home : fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice | White Hair Solution At Home : केस फारच पांढरे व्हायला लागलेत? काळ्याभोर, दाट केसांसाठी सकाळ-संध्याकाळ करा फक्त १ सोपा उपाय

White Hair Solution At Home : केस फारच पांढरे व्हायला लागलेत? काळ्याभोर, दाट केसांसाठी सकाळ-संध्याकाळ करा फक्त १ सोपा उपाय

सध्या केस पांढरे होण्याची समस्या इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक वयोगटातील लोक त्याला बळी पडतात. कमी वयात केस पिकल्यामुळे अनेकजण टेन्शन, स्ट्रेस, आणि कमी आत्मविश्वासाला बळी पडतात. यासाठी केमिकलयुक्त हेअर डाईचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे केस खराब होऊ शकतात. (How to control White hairs) केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही, तुम्ही नैसर्गिकरित्या पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेतल्यानंतरही केस चांगले दिसत नाही किंवा काहीवेळानंतर पुन्हा पांढरे दिसायला लागतात. या लेखात केस काळे करण्यासाठी तुम्ही कोणत्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता याबाबत सांगणार आहोत. (Hair Care Tips fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice)

१) मेथीचे दाणे रात्री पाण्याने भरलेल्या भांड्यात भिजत घालण्यासाठी ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा, असे काही दिवस केल्यास केसांचा पांढरेपणा निघून जाईल.

२) मेथीच्या औषधी गुणधर्मांबद्दल अनेकदा चर्चा केली जाते, जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. आता या पाण्याने केस धुवा.

३) केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो. यासोबतच गुळाचे सेवन केल्यास केस पांढरे होण्याच्या समस्येपासून लवकर सुटका मिळते. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी खूप गुणकारी आहे.

४) मेथीचे दाणे बारीक करून पावडर बनवा, आता त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी वयातच दूर होईल.

५) नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. मेथीचे दाणे बारीक करून डोक्याला लावल्यास केस काळे होतातच, पण केस गळणे आणि कोंडाही दूर होतो.

आयुर्वेदानुसार मेथी हे अनेक रोगांवर औषध आहे. त्‍याच्‍या बिया मसाले तसेच औषधी म्‍हणून वापरतात. मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. मेथीचे दाणे पावडरच्या स्वरूपात देखील वापरले जातात. मेथी आणि मेथीच्या तेलात गाठी होण्यापासून रोखण्याचे गुणधर्म असतात. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या सहज दूर होतात. जर तुम्हीही रोज सकाळी त्यांचे सेवन केले तर अशा धोकादायक आजारांपासून तुमची सुटका होऊ शकते. 

Web Title: White Hair Solution At Home : fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.