केस पांढरे होणं आजकाल प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये उद्भवतं. खाण्यापिण्यातील अनियमितता, हार्मोनल बदल यांमुळे केस लवकर पांढरे होतात. (White Hair Solution) पांढरे केस काळे करण्यासाठी आजकाल अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण त्यामुळे हवातसा फरक जाणवत नाही. डाय लावल्यानं तात्पुरते केस काळे होतात पण नंतर लगेच केस पांढरे दिसायला लागतात. हिटींग टुल्सचा अतिवापर, कौटुंबिक इतिहास यामुळे केस गळणं किंवा केस पांढरे होण्याचा त्रास तीव्रतेने जाणवतो. (Home Remedies for Gray Hair quick Natural Methods)
पांढरे केस काळे घरगुती करण्याचे उपाय
1) केस काळे करण्यासाठीही मेहेंदीच्या पानांचा वापर गुणकारी आहे. मेहेंदीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये तीन चमचे आवळा पावडर, एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमच दही मिसळा आणि हे मिश्रण केसांना समान रीतीने लावा, नंतर कोरडे झाल्यानंतर धुवा.
2) खोबरेल तेलात कढीपत्ता उकळवून घ्या. ते थंड झाल्यावर या तेलाने डोक्याला आणि केसांना मसाज करा. केस धुण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटे तसेच राहू द्या.
3) काळ्या तिळाचे तेल केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. किमान तीन महिने रोज एक चमचा काळे तीळ सेवन करा. तिळाच्या तेलाने केसांना मसाज करा, यामुळे फायदा होईल.
डार्क सर्कल्स कमीच होत नाही? फक्त १ बटाटा किसून सोपा उपाय करा, पूर्ण चेहरा दिसेल ग्लोईंग
4) बदाम तेल, लिंबाचा रस आणि आवळा रस समान प्रमाणात मिसळा. पांढऱ्या केसांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी या मिश्रणाने केसांना मसाज करा. या उपायानं हळूहळू केस काळे होतील.
5) कांद्याचा रस केस अकाली पांढरे होणे, केस गळणे आणि टक्कल पडणे टाळण्यास देखील मदत करतो. एका काचेच्या भांड्यात कांदा आणि लिंबाचा रस एकत्र करा. आपले केस आणि टाळूवर मसाज करा. 30 मिनिटे तसंच राहू द्या आणि सौम्य हर्बल शॅम्पूने केस धुवा.