केस नेहमी काळेभोर लांब असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं. वाढत्या वयात केस पांढरे होत जातात. खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, अन्हेल्दी पदार्थ यास जबाबदार ठरतात. (Hair Care Tips) अशा स्थितीत आत्मविश्वासाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. काही सोपे उपाय केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करूनही अनेकदा केसांना हवीतशी चमक मिळत नाही. (Tea leaves for premature white hair problem cure solution how to use home remedies) रोजचया वापरात असलेली चहा पावडर तुमचं हे काम सोपं करू शकते.
चहा पावडर वापरून मिळवा डार्क केस
पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही चहा पावडरचा वापर करू शकता. भारतात पाण्यानंतर सगळ्यात जास्त प्यायला जाणारा पदार्थ म्हणजे चहा. चहाच्या वापरानं पांढरे केस काळे करता येऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात.
अनेक पोषक तत्त्वे चहाच्या पानात आढळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता. यामध्ये नायट्रोजन 4 टक्के, पोटॅशियम 0.25 टक्के आणि फॉस्फरस 0.24 टक्के आढळते. खरंतर चहाच्या पानांचा रंग नैसर्गिक काळा असतो, ज्याच्या मदतीने पांढरे केस काळे करणे सोपे होते. ते केसांना कसे लावायचे ते समजून घेऊया.
केसांना चहा पावडर कशी लावायची
१) चहाची पाने थेट न लावता त्याचे पाणी वापरले जाते. यासाठी तुम्ही गॅसच्या शेगडीवर भांडे ठेवून उकळवा आता त्यात ४ ते ५ चमचे चहाची पाने टाका आणि पुन्हा ५ मिनिटे उकळा.
२) जर तुम्हाला त्याचा प्रभाव अधिक हवा असेल तर 1 कप कॉफी देखील मिसळा.
३) गॅसच्या शेगडीवर भांडे ठेवून पाणी उकळवा. आता त्यात ४ ते ५ चमचे चहाची पानं किंवा चहा पावडर टाका आणि पुन्हा ५ मिनिटे उकळा. जर तुम्हाला त्याचा प्रभाव अधिक हवा असेल तर 1 कप कॉफी देखील मिसळा.
४) हे मिश्रण पाणी अर्ध होईपर्यंत उकळा. आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी सोडा.
5) या चहाच्या पाण्याने केस धुवा, या दरम्यान शॅम्पू लावू नका. आता तुम्ही ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.