Join us  

कलर - डायशिवाय केस काळे करायचेत? चमचाभर मेथी दाण्यांचा सोपा उपाय; केस होतील दाट आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 6:43 PM

White Hair to Black Hair Naturally with use of Fenugreek Seeds : डायशिवाय केस काळे करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा?

केस पांढरे होण्याची समस्या बऱ्याच लोकांमध्ये हे अनुवांशिक असते (Black hair dye). तर अनेकांची जीवनशैली, केसांची योग्य निगा न राखणे, पोषक तत्वांचा अभाव या कारणांमुळे केस पांढरे होतात (Hair care Tips). केस काळे करण्यासाठी वेगवेगळे हेअर डाय म्हणजेच केसांचे रंग बाजारात उपलब्ध आहेत (Grey Hair Problem). याने केस काळे होतात, पण रासायनिक गोष्टीमुळे केसांचे नुकसान होते.

केस जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने काळे करायचे असतील तर, आपण मेथी दाण्यांचा वापर करू शकता. मेथी दाण्यांचा वापर केल्याने आपले केस काळे होतील. शिवाय केसांना पोषणही मिळेल. ज्यामुळे केस गळती, केसात कोंडा, केस निर्जीव होण्याची समस्या सुटेल(White Hair to Black Hair Naturally with use of Fenugreek Seeds).

केस काळे करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा?

लागणारं साहित्य

मेथी दाणे

‘ही’ १ घरगुती सोनेरी गोष्ट दह्यात मिसळून केसांना लावा, गळणारे केस ही समस्याच संपेल

कलौंजी 

खोबरेल तेल

'या' पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर केस होतील काळेभोर

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ चमचे मेथी दाणे आणि एक चमचा कलौंजी घालून वाटून घ्या. तयार पावडर गरम तव्यावर काढून घ्या व भाजून घ्या.

पावडर भाजून घेतल्यानंतर ४ चमचे तेल घालून मिक्स करा. २ मिनिटानंतर गॅस बंद करा. एका बाऊलवर चहाची गाळणी ठेवा. त्यात साहित्य ओतून तेल गाळून घ्या. अशा प्रकारे केस काळे करणारं मेथी दाण्याचा उपाय रेडी.

तयार तेल लावण्यापूर्वी केस विंचरून घ्या. स्काल्प आणि संपूर्ण केसांना लावा. काही वेळानंतर केस शाम्पू लावून धुवून घ्या. अशा प्रकारे आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे

कमी वयात केस पांढरे झालेत? हेअर फॉलही होतो? 'या' तेलात मिसळा '२' गोष्टी; घनदाट केसांचं सिक्रेट

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरू शकते. मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन - सी हे स्कॅल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट करण्यास मदत करतात. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स