आजकाल बरेचजण पांढऱ्या केसांच्या समस्येने हैराण आहेत. काहीजणांचे केस वयोमानानुसार पांढरे होतात तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. एवढेच नव्हे तर केसांवर सारख्या ब्युटी ट्रिटमेंट्स, केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने देखील केस पांढरे होतात. असे पांढरे केस लपवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण केसांना मेहेंदी, डाय, हेअर कलर लावतात, परंतु ही समस्या दूर होण्याऐवजी केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात(Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals).
केसांना मेहेंदी, डाय, हेअर कलर लावल्यानंतर लगेच केस काळे होत असले तरी ते पुन्हा कधी दिवसांनी पांढरे होतातच. या आर्टिफिशियल पर्यायांपेक्षा केसांसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. केसांना मेहेंदी लावणे हा पूर्वीपासूनचा एक नैसर्गिक उपाय आहे. या मेहेंदी सोबतच आपण त्यात आणखी काही नैसर्गिक (How To Convert Grey Hair To Black Naturally) घटक घालून त्यापासून केसांसाठी उपयुक्त असा हेअर मास्क बनवू शकतो. हा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत पाहूयात(How to Turn Grey or White Hair Black Naturally).
साहित्य :-
१. कॉफी पावडर - २ टेबलस्पून
२. मेहेंदी पावडर - २ टेबलस्पून
३. ग्रीन टी - १ टेबलस्पून
४. दही - २ टेबलस्पून
५. पाणी - गरजेनुसार
जास्वंदीच्या फुलांपानांचा ‘असा’ बनवा घरगुती हेअर मास्क, केस होतील दाट-काळेभोर, खर्च फक्त २० रुपये...
कृती :-
१. एका भांड्यात कॉफी पावडर, मेहेंदी पावडर, ग्रीन टी घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्यावी.
२. आता हे मिश्रण मंद आचेवर गरम करत ठेवावे.
३. या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून जाईपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर असेच ठेवून द्यावे.
४. या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून गेल्यानंतर त्यात दही घालावे.
५. दही घातल्यानंतर मिश्रण हलकेच शिजवून घ्यावे.
६. जेव्हा या मिश्रणाला दाट काळा रंग येईल आणि हे मिश्रण पातळसर पेस्टसारखे दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
७. आता हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे.
हा हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत :-
१. ज्या प्रमाणे आपण डाय आणि मेहेंदी केसांना लावता त्याच प्रमाणे हा हेअर मास्क केसांना ब्रशच्या मदतीने लावावा.
२. हेअर मास्क केसांना लावल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे तो तसाच केसांवर राहू द्यावा.
३. थोड्यावेळाने केस नॉर्मल पाण्याने धुवून टाकावेत, केस धुताना कोणत्याही प्रकारचा शॅम्पू किंवा साबणाचा वापर करू नये.
या हेअर मास्कमुळे आपले केस नैसर्गिकरीत्या काळेभोर होतील. या मास्कच्या वापरानंतर केस काळे करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम रंगांची किंवा डायची गरज भासणार नाही.