Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

White Hair To Black Naturally with Curry leaves and Black tea : केस इतके काळे होतील की म्हणाल, 'सुरक्षित माझे काळे केस-कडीपत्त्याने केली कमाल'..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 10:15 AM2024-02-20T10:15:15+5:302024-02-20T10:20:01+5:30

White Hair To Black Naturally with Curry leaves and Black tea : केस इतके काळे होतील की म्हणाल, 'सुरक्षित माझे काळे केस-कडीपत्त्याने केली कमाल'..

White Hair To Black Naturally with Curry leaves and Black tea | ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? ५ रुपयांच्या कडीपत्त्यात मिसळा एक काळं पाणी, शायनिंग केसांच सुपर सिक्रेट..

ऐन तारुण्यात पाऊल ठेवण्यापूर्वी बऱ्याचदा आपण स्वतःची अधिक काळजी घेऊ लागतो. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केस, त्वचा आणि लठ्ठपणाच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त होतात. मुख्य म्हणजे कमी वयात केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते (Curry Leaves for Hairs). जर आपले देखील केस कमी वयात पांढरे झाले असतील तर, केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर न करता, नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून पाहा (White Hairs).

केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसांचे आणखीन नुकसान होते. असे होऊ नये म्हणून, आपण  कडीपत्त्याचा वापर करू शकता. कडीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून, केसांच्या वाढीसाठीही मदत करते (Hair Care Tips). केस काळे करण्यासाठी कडीपत्त्याचा वापर कसा करावा? पाहा(White Hair To Black Naturally with Curry leaves and Black tea).

पांढरे केस काळे करण्याची नैसर्गिक ट्रिक

कमी वयात जर केस पांढरे झाले असतील तर, कडीपत्ता आणि ब्लॅक-टीचा वापर करून पाहा. याचा वापर करण्यासाठी कडीपत्त्याची पेस्ट तयार करा. एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी गाळून घ्या. त्यात कडीपत्त्याची पेस्ट मिक्स करा. थोड्या वेळानंतर त्यात खोबरेल तेल मिक्स करा. अशा प्रकारे पांढरे केस काळे करण्याची पेस्ट तयार.

आरोग्यासाठी घातक-चेहऱ्यासाठी वरदान; चमचाभर साखरेची चालते चेहऱ्यावर जादू-येईल नैसर्गिक तेज

पांढरे केस काळे करण्याची पेस्ट केसांवर कशा पद्धतीने लावावी?

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. तयार पेस्ट स्काल्प आणि केसांच्या टोकापर्यंत लावा. ४५ मिनिटांसाठी पेस्ट केसांवर तसेच ठेवा. ४५ मिनिटानंतर केसांना माईल्ड शाम्पू लावून धुवून घ्या.

केसांना कडीपत्ता आणि ब्लॅक-टी लावण्याचे फायदे

केसांना मिळते नैसर्गिक चमक

कडीपत्ता आणि ब्लॅक-टीमुळे केसांना नवी चमक मिळते. याची पेस्ट केसांना लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे स्काल्पमधील पोर्स ओपन होतात, व केसांना ऑक्सिजनसह पोषण मिळते. शिवाय केसांचा रंग सुधारते.

तिशीनंतर महिलांनी घ्यावी केसांची ‘अशी’ काळजी, नाहीतर केसांचा होतो झाडू-दिसतात बेजान

कोंड्यापासून मुक्त

कडीपत्ता आणि ब्लॅक-टीमुळे स्काल्प क्लिन होते. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्कॅल्प स्वच्छ करण्यासोबतच पोर्स देखील स्वच्छ करतात. यामुळे कोंडा होण्याची समस्या टळते. यासह स्काल्पवर खाज उठण्याची समस्याही कमी होते.

Web Title: White Hair To Black Naturally with Curry leaves and Black tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.