तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कमी वयातच लोकांचे केस पांढरे होतात, ताण तणाव, अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी अनेकदा केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचू शकते.
काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही काळेभोर दाट केस मिळवू शकता. पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट घेणं किंवा बाजारात उपलब्ध असलेले केमिकल्सयुक्त हेअर कलर्स केसांना लावणं यापेक्षा घरगुती उपाय केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील कारण त्याचे फारसे साईड इफेक्ट्सरही दिसून येत नाहीत.
१) आवळ्याचा वापर
आवळ्याचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. आवळ्याच्या वापरानं केसांना अनेक फायदे मिळतात. म्हणून सुकलल्या आवळ्यात पाणी घालून उकळून घ्या. भांड्यातील पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्या आणि त्यात मेहेंदी आणि लिंबाचा रस मिसळून केसांवर लावा. या उपायानं कमी वयात केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.
२) केसांवर दही लावा
केसांसाठी दही खूप फायदेशीर ठरते. तुम्ही किसलेला टोमॅटो दह्यात मिसळू शकता, त्यात थोडा लिंबाचा रस आणि निलगिरी तेल घाला. हे सर्व चांगले मिसळा आणि डोक्यावर मसाज करा, तेही आठवड्यातून 2-3 वेळा. हे केवळ केस पांढरे होण्यापासून रोखणार नाही तर केस मजबूत करेल.
३) आलं आणि मधाचा वापर
आले बारीक करून त्यात मध रस मिसळा. आठवड्यातून किमान दोनदा ते केसांवर लावा. यामुळे हळूहळू केस पांढरे होणे कमी होईल. हा उपाय कमीत कमी वेळा तुम्ही करू शकता.
४) नारळाचं तेल आणि कापूर
खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल हलके गरम करा आणि त्यात 4 ग्रॅम कापूर मिसळा. जेव्हा कापूर तेलात चांगले एकत्र होईल तेव्हा आपल्या केसांना मसाज करा. पांढर केस कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे.
५) नारळाचं तेल आणि दूधी
केस काळे करण्याची एक सोपी पद्धत आहे. ती म्हणजे दुधी घालून नारळाचं तेल उकळून घ्या. आता ते तेल गाळून घ्या. आता या तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा. यामुळे पांढऱ्या केसांच्या समस्येपासून आराम मिळेल.
६) मेहेंदी लावा
पांढरे केस काळे करण्यासाठी आजही मेहंदी हा सगळ्यात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून वापरला जातो. नैसर्गिक मेहंदी वापरल्याने केसांना पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. मेहेंदी हे नॅचरल कंडिशनर म्हणूनही ओळखले जाते.
७) कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा
डोक्यात पांढरे केस डोकावू लागताच चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंग असे कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतील अशी फळे आणि फॉलिक ॲसिड मुबलक असेल अशा भाज्या भरपूर खा. ग्रीन टी घेत जा.