केस पांढरे होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण जर केस वेळेआधीच पांढरे होत असतील तर वैद्यकिय परिभाषेत या स्थितीला कॅनिटाईस असं म्हणतात. जसजसं वय वाढू लागतं तसतसं शरीरात मेलेनिनचे उत्पादन कमी प्रमाणात होते. मेलेनिनमुळे केसांना रंग योग्यरित्या मिळतो. म्हातारं झाल्यानंतर शरीरात मेलेनिनचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. जर कमी वयात तुमचे केस पांढरे होत असतील नक्कीच तुमच्या शरीरात पोषक तत्वाचा अभाव असू शकतो. तुम्हाला कोणताही आजार असल्यास कमी वयात केस पांढरे होण्याची लक्षणं दिसू शकतात.
कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं
एखाद्या रोगाचे आणि पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण म्हणून नाही तर कधीकधी ते अनुवांशिक कारणांमुळे देखील होते. याशिवाय वाढत्या वयात केसांना आवश्यक पोषक तत्व न मिळाल्यानं केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
प्रोटीन्सची कमतरता
प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे केस पांढरे होणं हे खूपच सामान्य आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांचे केस कमी वयात पांढरे झालेले पाहायला मिळतात.
व्हिटामीन बी १२ ची कमतरता
शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता हे देखील केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरते. केसांमधील व्हिटॅमिनच्या कमतरता ज्यामुळे केसांची वेगाने पांढरे होण्याची समस्या वाढते व्हिटॅमिन बी -12 मिळवण्यासाठी काही पदार्थांचा आजपासूनच आहारात समावेश करायला हवा.
या आजारांमुळे केस पांढरे होतात
थायरॉईड
हायपोथायरॉईडीझममुळे केस जलद गतीनं पांढरे होतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथींमध्ये हार्मोन्सचे उत्पादन कमी होते तेव्हा शरीरात ही समस्या उद्भवते.
डाऊन सिंड्रोम
डाऊन सिंड्रोम हा अनुवांशिक विकार आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीला ही समस्या आहे, त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस यापूर्वी या प्रकारची समस्या असावी. डाऊन सिंड्रोममध्ये, एखाद्या व्यक्तीच्या चेहरा, नाक आणि मानेच्या आकारात बदल होतो. चेहरा आणि नाक सपाट होते आणि मान आकाराने लहान होतो. या बरोबरच केस पांढरे होऊ लागतात. अनुवांशिक रोग असल्याने, या समस्येचे संपूर्ण निदान अनेकदा शक्य होत नाही.
वर्नर सिंड्रोम
वर्नर सिंड्रोम हा एक आजार आहे ज्यामध्ये एखाद्याच्या त्वचेचा रंग बदलतो, त्याला अंधुक दृष्टी किंवा मोतीबिंदू येते. हा एक अनुवांशिक रोग देखील आहे, ज्यामुळे प्रभावित व्यक्ती अगदी लहान वयातच वृद्धापकाळाला बळी पडते. यामुळे त्वचेचा रंग आणि केसांचा रंग बदलू लागतो. तसेच, अशा मुलांची उंची देखील सामान्यत: वाढू शकत नाही. ही मुले अगदी लहान वयातच म्हातारं झाल्याप्रमाणे दिसू लागतात.
ताण तणावामुळे केस पांढरे होतात
हे बर्याच वेगवेगळ्या अभ्यासामध्ये समोर आले आहे की तणावामुळे केस जलद पांढरे होतात. कारण तणावामुळे, आपल्या मेंदूत कॉर्टिसोल आणि ड्रेनालाईन नावाचे हार्मोन्स तयार होण्यास सुरूवात होते. या हार्मोन्सचा आपल्या शरीरातील मेलेनोसाइट्सवर वाईट परिणाम होतो आणि त्यांचे स्तर कमी करण्यास सुरूवात होते. यामुळे केसांचा रंग वेगाने पांढरा होऊ लागतो.
अन्य कारणं
लहान वयात केस पांढरे व्हायला काही इतर कारणे देखील आहेत. यात न्यूरोफिब्रोमेटोसिस (ट्यूमर, हाडांची वाढ), त्वचारोग (रोग प्रतिकारशक्ती सिंड्रोमचा एक प्रकार) इत्यादींचा समावेश आहे. आपल्या आहारात लोह, तांबे, सेलेनियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक घटकांचा समावेश करा. हे आपल्याला शरीराला संपूर्ण पोषण देईल आणि मेलाटोनिनची स्थिती सुधारण्यास मदत करेल. जेणेकरून कमी वयात केस पांढरे होणार नाहीत.