वाढत्या वयात केस पांढरे होण्याची समस्या सर्वांनाच उद्भवते. वारंवार डाय लावूनही केसांची गुणवत्ता खराब होते आणि सतत केमिकल्सच्या संपर्कात आल्यानं केस गळू लागतात. एकदा केस पिकायला लागले की कितीही प्रयत्न केला तरी केसांचा काळा रंग पुन्हा मिळत नाही. (White Hairs Solution) केस काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. केस पांढरे झाले की आत्मविश्वास कमी होऊ लागतो. हेअर डाय करावा लागू नये म्हणून कित्येक लोक टोपीनं आपलं डोकं झाकतात. काही घरगुती उपायांनी ही तुम्ही केस काळेभोर करू शकता. (White Hairs Causes and ways to prevent it)
केस काळे करण्याचे उपाय
१) काळा चहा
रोज सकाळी फ्रेश वाटण्यासाठी अनेकजण चहा घेतात. चहाचा वापर करून तुम्ही केसही काळे करू शकता. यासाठी काळ्या चहाची पाने शिजवून केसांना लावा आणि काही वेळ ठेवल्यानंतर शॅम्पूने डोके धुवा. तुम्ही चहाची पाने बारीक करून पेस्ट तयार करू शकता आणि त्यात लिंबाचा रस घालू शकता. आता हे मिश्रण केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा. काही दिवसातच फरक स्पष्टपणे दिसून येईल.
२) कढीपत्ता
जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वंयपाकघरात कढीपत्त्याचा वापर केला जातो. पण याचा वापर केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. सर्व प्रथम कढीपत्ता, आवळा पावडर आणि ब्राह्मी पावडर मिक्समध्ये बारीक करून घ्या. पेस्ट तयार झाल्यावर केसांवर लावा आणि ३० मिनिटे वाळवा मग स्वच्छ पाण्याने केस धुवा.
३) आवळा
आवळा केसांना काळे करण्यासाठी एक उत्तम औषध मानलं जातं. यात वेगवेगळ्या हेअर केअर उत्पादनांचा वापर केला जातो. याच्या मदतीने आयुर्वेदिक पद्धतीने केस काळे करता येतात. सगळ्यात आधी आवळा पावडर एका भांड्यात ठेवा आणि ती काळी होईपर्यंत शिजवा. आता त्यात थोडे खोबरेल तेल टाका आणि मंद आचेवर गरम करा आणि नंतर ते थंड होण्याची वाट पाहा. दुसऱ्या दिवशी ते एका काचेच्या बाटलीत साठवा आणि तुमच्या टाळूची नियमित मालिश करा. यामुळे केसांमध्ये नैसर्गिक काळेपणा येईल.