Join us  

चेहऱ्यावरचे व्हाईटहेडस खूप खराब दिसतात? 5 उपाय, हमखास घरच्याघरी तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 4:06 PM

सौंदर्य वाढविण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय...

ठळक मुद्देसौंदर्य वाढविण्यासाठी महागडी उत्पादनेच लागतात असं नाही, सोप्या उपायांनीही करता येऊ शकते समस्यांवर मातसहज करता येण्याजोगे सोपे उपाय, नक्की करुन पाहूया

व्हाइटहेडस ही सध्या तरुणींना आणि सर्वच वय़ोगटातील महिलांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या आहे. चेहऱ्याचे सौंदर्य चांगले राहावे यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. यामध्ये चेहऱ्याचा कोरडेपणा घालवणे, चेहऱ्यावर आलेले पुरळ, ब्लॅकहेडस, व्हाइटहेडस घालवणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. विशेषत: पुरळ किंवा मुरुम यांचे दोन प्रकारांत विभाजन करता येते. एक म्हणजे दाहक आणि दुसरी दाहक नसलेली. जी मुरमे दाहक नसतात त्यांमध्ये ब्लॅकहेडस आणि व्हाइटहेडस असतात. ब्लॅकहेडस सामान्यपणे ओपन असतात. पण व्हाइटहेडस हे बंद स्वरुपाचे असतात. व्हाइटहेडस सामान्यपणे लहान आकाराचे असून ते त्वचेवर सहज दिसून येत नाहीत. मात्र त्वचेच्या आतल्या थरात असल्याने त्वचेची रंध्रे त्यांच्यामुळे बंद होऊ शकतात. त्यामुळे त्वचेला योग्य पद्धतीने ऑक्सिजन आणि मॉइश्चर मिळणे अशक्य होते. म्हणूनच व्हाइटहेडस वेळच्या वेळी काढणे गरजेचे असते. व्हाइट हेडस म्हणजे बॅक्टेरीया, सिबम आणि डेड स्कीन सेल्स यांचे बनलेले असते. आपण अनेकदा पार्लरमध्ये जाऊन फेस क्लिनिंग किंवा फेशियलसारख्या ट्रीटमेंट घेतो. पण दरवेळी अशाप्रकारे ट्रीटमेंट करणे शक्य असेलच असे नाही. अशावेळी घरच्या घरी व्हाइटहेडस काढायचे सोपे उपाय कोणते ते पाहूया...

(Image : Google)

वाफ घेणे – आपण जेव्हा वाफ घेतो तेव्हा आपल्या त्वचेची रंध्रे तात्पुरत्या स्वरुपात ओपन होतात. त्यामुळे ज्यांना समस्या भेडसावते त्यांनी नियमितपणे चेहऱ्यावर वाफ घेणे आवश्यक असते. त्वचेच्या ज्या भागांवर व्हाइट हेडस आहेत अशा भागांवर वाफ घेऊन हे व्हाइट हेडस बाहेर येण्यासाठी जागा करुन द्यायला हवी. हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. 

टी ट्री ऑईल – टी ट्री ऑईलमध्ये प्रतिजैविके आणि दाहक विरोधी असे दोन्ही गुणधर्म असतात. बहुतांश फेस वॉश, क्लिन्झर, टोनर्समध्ये टी ट्री ऑईल असते. कापसाच्या बोळ्याने टी ट्री ऑईल त्वचेवर लावल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला व्हाइट हेडस सहज काढता येऊ शकतात. 

क्लिंझिंग – चेहऱ्याचे योग्य पद्धतीने क्लिंझिंग करणे अतिशय आवश्यक असते. यामुळे त्वचेवर आलेला घाम, बसलेली धूळ निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा फेस वॉश किंवा क्लिंझर लावणे केव्हाही चांगले. दिवसातून दोन वेळा अशाप्रकारे चेहऱ्याचे क्लिंझिंग करायला हवे. 

जास्तीत जास्त हायड्रेटेड राहणे – त्वचा नितळ व सुंदर होण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. त्यामुळे दिवसभराच्या रुटीनमध्ये पाण्याचा योग्य प्रमाणात समावेश असायला हवा. याबरोबरच सरबत, शहाळं पाणी,, नीरा, सूप यांचाही समावेश करु शकता. त्यामुळे तुमची त्वचा नकळत ग्लो करण्यास मदत होईल. 

(Image : Google)

जंक फूड टाळावे – सतत जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. ब्लॅकहेडस आणि व्हाइटहेडस येण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे असे पदार्थ खाण्यापेक्षा आहारात फळं, भाज्या यांचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी