Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक? 

हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक? 

Alum Side Effects : हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ योग्य असतं का? किंवा हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक ठरतं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:18 IST2025-01-08T11:17:49+5:302025-01-08T11:18:35+5:30

Alum Side Effects : हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ योग्य असतं का? किंवा हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक ठरतं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Who should not bath with alum water in winter? | हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक? 

हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक? 

Benefits of Bathing with Alum Water : तुरटीचा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर फार आधीपासून केला जातो. एक्सपर्टनुसार तुरटीमध्ये अ‍ॅंटी-सेप्टिक, अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. तुरटीचा वापर पायांचं दुखणं दूर करण्यासाठी, जखम भरण्यासाठी, त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी, शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो. भरपूर लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. पण हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ योग्य असतं का? किंवा हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं कुणासाठी नुकसानकारक ठरतं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ कुणी करू नये?

स्कीन एक्सपर्ट सांगतात की, तुरटीचे त्वचेला अनेक फायदे मिळतात. पण तुरटीमुळे त्वचा ड्राय होते. अशात हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ केली तर त्वचा आणखी ड्राय होईल. त्यामुळे ज्या लोकांची त्वचा आधीच ड्राय आहे त्यांनी हिवाळ्यात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं टाळलं पाहिजे. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे त्वचेवरील चिकटपणा कमी होण्यास मदत मिळेल.

तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करण्याचे फायदे

पिंपल्स-पुरळ होईल दूर

तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पिंपल्स आणि त्वचेवर पुरळ येण्याची समस्या जास्त असते. जर चेहऱ्यावरही पिंपल्स किंवा पुरळ येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्यास फायदा मिळू शकतो. तुरटीमधील अ‍ॅंटी-सेप्टिक, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे पिंपल्स दूर करण्यास मदत मिळते.

इन्फेक्शन होईल दूर

हिवाळ्यात अनेकांना त्वचेचं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशात तुरटीच्या पाण्यानं आंघोळ केल्यास फायदा मिळू शकतो. यातील अ‍ॅंटी-सेप्टिक आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे त्वचेचं इन्फेक्शन दूर केलं जाऊ शकतं.

व्हाइट डिस्चार्जच्या समस्येत फायदेशीर

व्हाइट डिस्चार्जची समस्या असल्यावर तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला व्हाइट डिस्चार्ज होत असेल तर तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करावी. यानं यूटीआयसहीत वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.

जखम लवकर भरेल

जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी फिरवा. यानं इन्फेक्शन रोखण्यास मदत मिळेल आणि जखम लवकर बरी होईल.

Web Title: Who should not bath with alum water in winter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.