Join us  

वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 1:06 PM

Why am I going through hair loss after weight loss : वजन कमी करता करता केस गळत असतील तर, दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या...

हेल्दी फिट अँड फाईन शरीर कोणाला नकोय. सुदृढ शरीर मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. व्यायामासह डाएटकडेही विशेष लक्ष देतो. वजन कमी झाल्यानंतर शरीराला अनेक फायदे प्राप्त होतात. शरीर फिट अँड फाईन तर दिसतेच, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही टळतो. आजतागायत आपण वजन कमी करण्याचे (Weight Loss) फायदे ऐकले असतील, पण कधी नुकसान किंवा तोटे ऐकले आहेत का?

मुख्य म्हणजे वजन कमी करताना अनेकांना केस गळतीच्या सामन्याला जावे लागते. केस गळण्याची समस्या सामान्य आहे. पण वजन कमी करताना केस का गळतात? (Hair Fall) वजनाचा आणि केसांचा संबंध काय? या प्रश्नांची उत्तरं कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का?(Why am I going through hair loss after weight loss).

वजन कमी केल्यानंतर केस का गळतात?

अचानक वजन कमी होणे आणि कमी पौष्टिक आहार हे केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. ही कारणं टेलोजन इफ्लुव्हियमशी संबंधित आहेत. बऱ्याचदा वजन करताना आपल्या आहारातून बऱ्यापैकी पोषण मिळत नाही. ज्यामुळे केसांना हवे तसे पोषण मिळत नाही. ज्यामुळे केसांची वाढ खुंटते आणि केस गळतात.

खोबरेल तेलात मिसळा ४ गोष्टी, केस गळणं थांबेल; केस वाढतील भरपूर आणि झरझर

क्रॉनिक टेलोजेन इफ्लुव्हियम, जे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकते. ज्यामुळे केस गळतात, व पुन्हा नव्याने केस येण्यास विलंब लागतो. अशावेळी केसांना योग्य प्रकारे वाढण्यासाठी कॅलरी आणि पोषक तत्वांची गरज भासते. जे वेट लॉस दरम्यान, शरीराला आहाराद्वारे मिळत नाही.

बऱ्याचदा लोकं वजन कमी करण्यासाठी क्रॅश डायटिंगचा ऑप्शन निवडतात. यामध्ये आहारातून योग्य प्रमाणात कॅलरीज मिळत नाही. या डाएटमुळे वजन तर कमी होतेच, पण केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. शिवाय प्रोटीनच्या कमतरतेमुळेही केस गळतात. आहारातून जर शरीराला आयर्न, झिंक, प्रोटीन,  सेलेनियम आणि आवश्यक फॅटी ऍसिड मिळाले नाही, की केस गळण्याची समस्याही वाढू शकते.

यावर उपाय काय?

- वजन कमी करताना क्रॅश डाएटला फॉलो करू नका. क्रॅश डाएट घेत असताना कॅलरी काउंट बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ज्यामुळे वजन तर कमी होते, पण पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्यास सुरुवात होते.

- वजन कमी करताना शरीराला अनेक पोषक घटकांसोबतच  प्रोटिन्सची गरज असते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार घ्या.

७ फूट लांब केस असलेल्या महिलेने फक्त ४ घरगुती गोष्टी वापरत राखली केसांची निगा

- वजन कमी करताना नेहमी पाणी पीत राहा. शरीराला डिहायड्रेटेड होऊ देऊ नका. जेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणावर डिहायड्रेशन होते तेव्हा केस भरपूर प्रमाणात गळतात. त्यामुळे योग्यप्रमाणात पाणी पीत राहा.

- जर पौष्टीक आहाराचे सेवन करूनही केस गळती थांबत नसेल तर, एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सवेट लॉस टिप्स