आपण सुंदर दिसले पाहिजे अशी मनोमन सगळ्याच स्त्रियांची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया सध्याचे मेकअप ट्रेंडिंग फॉलो करतात. त्याचबरोबर बदलत्या ट्रेंडमध्ये अनेक गोष्टी बदलताना दिसत असल्या तरीही मेकअप संदर्भातील अनेक मूलभूत गोष्टी आजही तशाच आहेत. तुम्ही मेकअपसाठी महागडी आणि ब्रॅंडेड प्रॉडक्ट्स खरेदी करत असता. मात्र अशी साधने योग्य प्रकारे कशी वापरावी हे कळत नाही तोवर ती तुमच्यासाठी निरुपयोगी आहेत.
विविध प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स खरेदी करुन तुमचा मेकअप बेस्ट होईल असे वाटत असेल तर ते चूकीचे ठरू शकते. तुमच्या मेकअपमध्ये परफेक्टनेस हवा असेल आणि मेकअपच्या चुकांपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर योग्य मेकअप टूल्स वापरणे महत्वाचे आहे. प्रत्येक प्रकारचा मेकअप करण्यासाठी विविध टूल्स आणि ब्रश असतात ज्यांचा वापर आपण मेकअपसाठी करतो. यामुळे केवळ तुम्हाला मेकअप करणे गरजचे नसते तर त्याच्या टूल्ससंदर्भातही माहिती असावे लागते. यासाठीच आपण मेकअप करताना मेकअप प्रॉडक्ट्सना ब्रश किंवा अॅप्लीकेटरनेच चेहेऱ्यावर का लावावे? हे पाहूयात(The Importance of Good Makeup Brushes, Applicator & Other Tools).
मेकअप करताना मेकअप प्रॉडक्ट्सना ब्रश किंवा अॅप्लीकेटरनेच चेहेऱ्यावर का लावावे?
१. हायजिन किंवा स्वच्छतेसाठी :- मेकअप करताना मेकअप संदर्भातील प्रॉडक्ट्स आणि ते चेहेऱ्यावर लावण्यासाठीचे टूल्स यांच्या स्वच्छतेबाबत काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यासाठीच चेहऱ्यावर कोणतेही मेकअप प्रॉडक्ट्स वापरण्यापूर्वी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर आपण स्वच्छ साधनांचा किंवा टूल्सचा व प्रॉडक्ट्सचा वापर केला नाही तर आपल्या चेहऱ्यावर मुरुम किंवा पिंपल्स येऊ शकतात. तसेच वारंवार वापरुन न धुतलेलं मेकअप टुल्स आहे तसेच वापरल्यास आपल्याला स्किनसंदर्भातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
२. मेकअप व्यवस्थित सेट करण्यासाठी :- मेकअप करताना तो व्यवस्थित चेहेऱ्यावर बसावा तसेच तो नीट सेट करण्यासाठी अॅप्लीकेटर किंवा मेकअपब्रशचा वापर केला जातो. मेकअप करताना जे प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावतो ते ब्रशवर थोडे थोडे घेऊन मगच चेहऱ्यावर लावावेत. एकदम एकाच वेळी जास्तीचे प्रॉडक्ट्स ब्रशवर किंवा अॅप्लीकेटरवर घेऊन लावू नयेत. यामुळे मेकअप बिघडू शकतो. मेकअप प्रॉडक्ट्स थोडे थोडे ब्रशवर घेऊन लावल्याने मेकअप प्रॉडक्ट्सची नासाडी होत नाही. तसेच आपल्याला पाहिजे त्या प्रमाणातच मेकअप प्रॉडक्ट्स ब्रशवर घेऊन चेहऱ्याला लावता येतात. ब्रश किंवा अॅप्लीकेटरने हळुहळु मेकअप केल्यास मेकअपमध्ये चुका होण्याची शक्यता देखील कमी होईल. त्याचप्रमाणे ब्रश किंवा अॅप्लीकेटरचा वापर केल्यास मेकअपचे ब्लेंडींग करणे देखील सोपे जाईल.
३. मेकअप प्रॉडक्ट्सच्या प्रमाणाचा अंदाज लावता येतो :- कोणते मेकअप प्रॉडक्ट् किती प्रमाणांत लावावे याचा आपल्याला बहुतेकवेळा अंदाज लावता येत नाही. यासाठीच आपण स्पॅच्युलाच्या मदतीने मेकअप प्रॉडक्ट् एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि मग थोड्या प्रमाणात हळू हळू घेऊन चेहऱ्यावर लावतो. यामुळे आपल्याला मेकअप प्रॉडक्ट्सच्या प्रमाणाचा अंदाज लावता येतो. तसेच कोणते प्रॉडक्ट् किती प्रमाणात घ्यावे याचे अचूक प्रमाण आपल्याला समजते.जेव्हा तुम्ही ब्रशने त्वचेवर एखादे मेकअप प्रॉडक्ट् लावता त्यावेळी ते उत्पादन त्वचेवर चांगल्या प्रकारे पसरवण्यासाठी स्पंजचा वापर करणे महत्वाचे ठरते. कारण, स्पंज हे मेकअपच्या कोणत्याही उत्पादनाला त्वचेवर चांगल्या प्रकारे पसरवण्याचे काम करते. शिवाय, स्पंज ते उत्पादन चांगल्या प्रकारे शोषते आणि त्वचेवर जितके आवश्यक असेल त्या प्रमाणात स्पंजच्या सहाय्याने लावता येते.
ब्युटी ब्लेंडरमधला स्पंज साफ करणं म्हणजे डोक्याला ताप? पाहा ३ सोप्या पद्धती, सफाई होईल चटकन...
४. मेकअप प्रॉडक्ट्सचे मिक्सिंग करणे :- काहीवेळा मेकअप करताना आपण कोणत्याही लिक्विड किंवा क्रिम प्रॉडक्ट्सचा परफेक्ट शेड बनविण्यासाठी त्यांना एकत्रित मिक्स करुन घेतो. दोन प्रॉडक्ट्सचे हे एकत्रित मिक्सिंग करण्यासाठी आपल्याला स्पॅच्युलाची गरज लागते. सर्वात आधी आपण हे मिक्सिंग करायचे दोन प्रॉडक्ट्स स्पॅच्युलाच्या मदतीने एका डिशमध्ये काढून घेतो. मग ते व्यवस्थित एकमेकांत ब्लेंड करून आपल्याला हवा तसा शेड तयार करुन घेतो. त्यानंतरच आपण हा शेड आपल्या चेहऱ्यावर लावतो.