स्त्रियांना मेकअप करणे खूप आवडते. कुठे काही खास फंक्शन, सण, कार्यक्रम असला की त्या आवर्जून मेकअप करतात. मेकअप करणे हा स्त्रियांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. मेकअप केल्याने आपल्या सौंदर्यात आणखीनच भर घातली जाते. मेकअप चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच स्त्रियांचा आत्मविश्वास देखील वाढवण्यास मदत करते. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. कंन्सीलर आणि फाऊंडेशन ही दोन्ही सौंदर्य प्रसाधन मेकअप करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरतात. यासाठी काही महत्वाची सौंदर्य प्रसाधन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने स्किनवर लावणे अतिशय महत्वाचे असते.
जर मेकअप योग्य रितीने नाही केला तर मेकअपच आपल्या चेहर्याला अधिक खराब बनवू शकतो.चेहऱ्यावर मेकअप करताना आपण सर्वप्रथम कंन्सीलर आणि फाऊंडेशनचा वापर करतो. हे लावताना आपण छोट्या छोट्या डॉट्सच्या स्वरूपातच चेहऱ्यावर लावतो. कंन्सीलर आणि फाऊंडेशन लावताना ते छोट्या छोट्या डॉट्सच्या स्वरुपातच का लावावे, यामागची कारणे नक्की काय आहेत(Know The Reason Of Using Concealer & Foundation In Dots).
कंन्सीलर व फाऊंडेशन लावताना ते छोट्या छोट्या डॉट्सच्या स्वरुपातच का लावले जाते ?
१. मेकअप करताना चुका होऊ नयेत म्हणून :- मेकअप करताना काहीवेळा घाईगडबडीत आपण चुकून कंन्सीलर व फाऊंडेशन भरपूर प्रमाणांत हातावर ओतून घेतो. गडबडीत चुकून आपल्या हातून चेहऱ्यावर जास्तीचे कंन्सीलर व फाऊंडेशन लागू नये, याहेतूने कंन्सीलर व फाऊंडेशन लावताना ते छोट्या डॉट्सच्या स्वरुपातच लावावे. काहीवेळा कंन्सीलर व फाऊंडेशन जास्त लागून आपला चेहरा व मेकअप खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कंन्सीलर, फाऊंडेशन लावताना ते आपल्या गरजेनुसारच लावावे, उगाच जास्तीचे कंन्सीलर व फाऊंडेशन आधीच बाटलीबाहेर काढून ठेवू नये. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मेकअप करताना चुका होऊ नयेत म्हणून कंन्सीलर व फाऊंडेशन छोट्या डॉट्सच्या स्वरुपात लावावे.
२. सौंदर्य प्रसाधनांची बचत :- बाजारांत ब्रँडेड आणि चांगल्या दर्जाची सौंदर्य प्रसाधन खूप महागड्या किमतीत विकली जातात. कंन्सीलर आणि फाऊंडेशन छोट्या डॉट्सच्या स्वरुपात लावल्याने ते अगदी कमी प्रमाणांत वापरले जाते. यामुळे हे प्रॉडक्ट्स कमी प्रमाणांत वापरले जाऊन बराच काळ टिकतात. यामुळे ही महागडी सौंदर्य प्रसाधन वारंवार खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. परिणामी पैश्यांची बचत होते.
३. योग्य ब्लेंडिंग करण्यासाठी :- मेकअप जर चेहेऱ्यावर व्यवस्थित लागला तरच आपले सौंदर्य उठून दिसते. मेकअप चेहऱ्यावर सेट होण्यासाठी, सर्वत्र समप्रमाणात मेकअप लागण्यासाठी, योग्य ब्लेंडिंग होण्यासाठी कंन्सीलर, फाऊंडेशन लावताना ते छोट्या डॉट्सच्या रुपात लावावे. कंन्सीलर, फाऊंडेशन छोट्या डॉट्समध्ये लावल्याने ते चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड करणे सोपे जाते व चेहऱ्यावर जास्त पसरत नाही.
४. फिनिशिंग करणे होते सोपे :- मेकअप केल्यानंतरही आपली स्किन व मेकअप नैसर्गिक आणि ग्लोइंग दिसावा असे प्रत्येकीला वाटत असते. कंन्सीलर, फाऊंडेशन यांसारख्या लिक्विड मेकअप प्रॉडक्ट्सनां डॉट्समध्ये लावल्याने चेहेऱ्यावर नैसर्गिक फिनिशिंग आणणे सोपे जाते.
५. अतिरिक्त वापर टाळता यावा यासाठी :- कितीही महागडी आणि चांगल्या दर्जाची सौंदर्य प्रसाधन विकत घेतली तरी ती स्किनसाठी वारंवार वापरणे योग्य नाही. सौंदर्य प्रसाधनांमध्ये विविध केमिकल्सचा भरपूर प्रमाणांत वापर केलेला असतो. या केमिक्लसचा आपल्या स्किनवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे स्किन संबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सौंदर्य प्रसाधांचा कमीत कमी वापर करावा.