सगळ्याच महिलांना आपला बॉडी शेप आणि फिगर ही परफेक्टच असावी अशी इच्छा असते. कित्येक महिला तर परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी अनेक उपाय करतात. परफेक्ट फिगरसाठी बहुतांश महिला डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत सर्वच उपाय करून पाहतात. त्यातच ३६ - २४ - ३६ या सौंदर्य मापांची चर्चा होत असते. बाजारपेठ, सिनेमे हे सारे या फिगरमध्ये सौंदर्य मोजतात. मात्र ही मापंच योग्य आणि तेच म्हणजे सौंदर्य हे कुणी ठरवलं? मध्यंतरी करिना कपूरमुळे झिरो फिगरची फार चर्चा होती. मात्र या मापांचा अट्टाहास का? हे सारं कुठून आलं(Why Do People Say That 36-24-36- Are Perfect Measurements For Women).
ऑवरग्लास फिगर म्हणजे नेमकं काय ?
ऑवरग्लास फिगरला कर्वी फिगर असे देखील म्हटले जाते. ऑवरग्लास फिगरमध्ये, बस्टचा आकार हा ३६, कमरेचा घेरा २४ आणि हिप्सचा आकार ३६ अशा मापात असतो. कोणत्याही कर्वी फिगरला आपण ऑवरग्लास फिगर म्हणू शकतो. परंतु ३६ - २४ - ३६ या मापाला परफेक्ट ऑवरग्लास शेप मानला जातो. ज्या फिगरमध्ये पोट आणि कमरेचा भाग एकदम बारीक आणि हिप्स व बस्ट थोडेसे रुंद असतील अशा फिगरला ऑवरग्लास फिगर म्हटले जाते.
हाच बेस्ट साइज किंवा शेप का मानला जातो?
महिलांसाठी ३६ - २४ - ३६ हाच बेस्ट साइज किंवा शेप आहे असे मानले जाते. हा शेप महिलांसाठी बेस्ट असण्याचे श्रेय जगातील सर्वात मोठी सेक्स सिम्बॉल अभिनेत्री असणाऱ्या मर्लिन मुनरो (Marilyn Monroe - American actress) हिला दिले जाते. १९५० च्या दशकात मर्लिन मुनरो हिने या फिगरची ओळख जाहिरात आणि चित्रपटांच्या दुनियेत करुन दिली. त्या दशकांत या फिगरला 'Flesh in Proper Places' असे मानले जायचे.
त्या काळात एका जाहिरातीत मर्लिनचा फोटो छापून आला होता. तेव्हा तिची ही मापं होती असं जाहीर सांगण्यात आलं. त्या जाहिरातीनंतर बऱ्याचजणींच्या मनात अशी आपली फिगर असावी अशी इच्छा निर्माण होऊ लागली. ३६ - २४ - ३६ या बॉडी साइजला मर्लिन मनरो हिने एक प्रकारची ओळख दिल्यानंतर सगळ्यांनाच ही फिगर साइज व शेप आवडू लागला. त्यानंतर हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनीं या साइज आणि शेपमध्ये फिगर बनविण्यासाठी ३६ - २४ - ३६ हेच बेस्ट साइज समजून ते फॉलो करण्याचा प्रयत्न करु लागल्या.
त्यावेळी मर्लिन केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात ओळखली जात होती. तिला सर्वात सुंदर स्त्री मानले जात असे, तिने जे काही परिधान केले त्याचा लगेचच फॅशन ट्रेंड बनत असे. यामुळे ३६ - २४ - ३६ हीच सर्वात आकर्षक फिगर मानली जाते. आजच्या ट्राएंगल, इन्वर्टेड ट्राएंगल, रेक्टेंगल, पेअर शेप, अॅपल शेप यांसारख्या विविध शेप्सना त्या काळात फारसे मानले जात नसे. आता जरी अॅब्स आणि कट्स परफेक्ट मानले जात असले तरी त्या काळात मर्लिनची बॉडी फिगर हिच सर्वोत्तम मानली जात होती. आजही अनेकींना तीच फिगर बेस्ट वाटते.