बिघडलेल्या जीवनशैलीचा फटका फक्त आरोग्याला नसून वजन, त्वचा आणि केसांना (Hair care Tips) देखील सहन करावा लागतो. काही लोकांचे केस फार गळतात. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. केसांची योग्य निगा न राखल्यामुळे गळतात. तर काही जणींचे केस शरीराला योग्य आहार न मिळाल्यामुळे गळतात. केसांची निगा राखताना आपण केसांना तेल लावतोच. तेल लावून चंपी करतो.
पण बऱ्याचदा केसांना तेलातील पोषण मिळण्याऐवजी गळतात. असं तुमच्यासोबत देखील घडलंय का? केसांना तेलाने चंपी केल्यानंतर हातात केसांचा झुपका येतो का? केसांना तेल लावण्याची पद्धत किंवा चंपी केल्यानंतर कोणत्या चुका घडल्याने केस गळतात? यासंदर्भातील माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ दीपाली भारद्वाज यांनी दिली आहे(Why Does My Hair Shed When I Apply Oil).
केसांना तेल लावल्यानंतर गळतात
अनेकींची तक्रार असते की तेल लावल्यानंतरही केस गळतात. पण केस तेल लावल्यामुळे नसून, हेअर फॉल स्टेजमध्ये असल्यामुळे गळतात. केसांचे चक्र वेगळे असते. जेव्हा ते गळण्याच्या स्टेजमध्ये असतात, तेव्हा ते तेल लावण्यापूर्वी आणि नंतर हमखास गळतात. मात्र, गळणारे केसही वेगाने वाढतात.
तूर, मूग नाही तर थेट कुळथाच्या डाळीने घटते वजन, सद्गुरु सांगतात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे ही डाळ
केसांना तेल लावताना टाळा ५ चुका
- तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरू नका. तेल लावल्यानंतर स्काल्प रिलॅक्स मोडवर असते. त्यामुळे कंगव्याने केस विंचरताना ते अधिक गळतात.
- केसांना तेल लावल्यानंतर त्वरित धुवू नका. केसांना तेल लावल्यानंतर त्वरित केस धुतल्याने स्काल्पला पोषण मिळत नाही. त्यामुळे तेल लावल्यानंतर साधारण एक तासानंतर केस धुवा.
दुधात ५ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, नकोसे केस गायब - चेहऱ्यावर येईल नवे तेज
- रात्रभर केसांना तेल लावून झोपू नका. कारण स्काल्पवर आपल्या धूळ-माती असते. जे तेलातून मिसळून टाळूच्या आत प्रवेश करते. ज्यामुळे केस अधिक गळतात.
- जास्त तेल लावल्याने, ते तेल काढण्यासाठी आपल्याला जास्त शाम्पूची गरज पडते. शाम्पूमध्ये केमिकल रसायने असतात. ज्यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल देखील निघते. ज्यामुळे केस अधिक कोरडे आणि गळू लागतात.
- केसांना तेल लावल्यानंतर घट्ट बांधू नका. यामुळे मुळांवर दबाव निर्माण होऊ शकतो आणि केस गळू लागतात.