उन्हाळ्यात घाम येण्याची समस्या वाढते. या समस्येमुळे संपूर्ण अंग चिपचिपित होते. केसांपासून ते नखाच्या टोकापर्यंत उन्हामुळे शरीराची लाही लाही होते. डोक्यालाही प्रचंड घाम येतो. ज्यामुळे केसांमधून दुर्गंधी पसरते. यासह केस चिकट होतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो.
दुर्गंधी व चिकटपणा काढण्यासाठी आपण दररोज केस धुवू शकत नाही. केस दररोज धुतल्याने केस गळतीची समस्या वाढते. केसांमधून येणारा वास दूर करायचा असेल तर, काही ट्रिक्स फॉलो करून पाहा. या ट्रिक्समुळे केसांमधून दुर्गंधी येणार नाही, व केस चिकट देखील होणार नाही(Why Does Your Hair Smell And How To Get Rid Of It?).
लिंबू
लिंबू केसांसाठी वापरण्यात येतो हे तुम्हाला माहित होते का? परंतु, केसांवर लिंबाच्या रसाचा वापर करण्यापूर्वी, त्यात डायल्यूट मिक्स करायला विसरू नका. फक्त लिंबाचा रस केसांवर लावणे टाळा. लिंबाचा रस केसांना लावल्याने दुर्गंधी तर दूर होईलच, यासह कोंड्याची समस्याही कमी होईल.
हेयर रिंस करण्यासाठी लागणारं साहित्य
फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय
लिंबू
पाणी
अशा पद्धतीने करा वापर
सर्वप्रथम, केस स्वच्छ धुवून घ्या, एका वाटीत लिंबाचा रस व पाणी समप्रमाणात घ्या. केस धुवून झाल्यानंतर हेयर रिंसने केस धुवून घ्या. या उपायामुळे केसांमधून दुर्गंधी येणार नाही. व कोंड्याचीही समस्या दूर होईल.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलच्या वापराणे केसांमधून चिकटपणा निघून जाईल, यासह केसांमधून दुर्गंधीही येणार नाही.
यासाठी लागणारं साहित्य
टी ट्री ऑईल
बदाम तेल
अशा पद्धतीने करा वापर
टी ट्री ऑईल व बदाम तेल एकत्र घेऊन मिक्स करा, हे तेल स्काल्पवर लावून मसाज करा. अर्धा तास झाल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायामुळे केस चिकट होणार नाही, व दुर्गंधीही येणार नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा
रात्री चेहऱ्यावर 'या' तेलाचे २ थेंब लावून झोपा, त्वचेची समस्या होईल कमी, सकाळी दिसाल फ्रेश - सुंदर
केसांमधून दुर्गंधी येऊ नये असे वाटत असेल तर, आठवड्यातून किमान २-३ वेळा केस धुवा.
तेलकट स्काल्पमुळे केसांना वास येतो. म्हणूनच टाळू स्वच्छ ठेवा. स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी तेलाने मसाज करा.
केसांचा स्पा करा. यामुळे केस निरोगी व केसांच्या निगडीत समस्या कमी होतील.