आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत. सुंदर दिसण्यासाठी अनेक स्त्रिया आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी दर महिन्याला पार्लरमध्ये महागड्या ट्रिटमेंट्स करण्यावर जास्त भर देतात. काही महिला तर दर महिन्याला आपले पार्लरमध्ये जायचे रुटीन अतिशय काटेकोरपणे फॉलो करताना दिसतात. आपण सुंदर दिसावे यासाठी स्त्रिया फेशियल, क्लिनअप, ब्लिच, वॅक्सिंग, आयब्रो अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. फेशियल ही एक स्किनकेअर ट्रिटमेंट् आहे ज्यात, विविध उत्पादने आणि तंत्रांचा वापर करुन मृत त्वचा आणि अशुद्धता एक्सफोलिएशनद्वारे काढून टाकली जाते. त्याचबरोबर त्वचेला फेसमास्क आणि क्रिमने हायड्रेशन केले जाते.
बदलत्या काळानुसार वाढते प्रदूषण, रोजची धावपळ यामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरुन काढण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. त्वचेला दर अमूक काही दिवसांनी खोलवर स्वच्छ करणे आवश्यक असते यात शंका नाही. यासोबतच त्वचेला योग्य ते पोषण मिळणेही खूप महत्त्वाचे आहे. फेशियल या दोन्ही गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. यामुळेच तुम्ही कोणत्याही स्किन एक्सपर्टकडे गेलात तरी ते आपल्याला फेशियल करण्याचा सल्ला देतात. साधारणपणे स्त्रिया महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा फेशियल करून घेतात. मात्र, महिन्यातून दोनदा म्हणजेच १५ दिवसांतून एकदा फेशियल केले तर त्वचेला त्याचा अधिक फायदा होईल, असे म्हटले जाते. दर १५ दिवसांनी फेशियल फेशियल करण्याचा सल्ला का दिला जातो ते पाहूयात(Why facials should be done every 15 days, what does the doctor say).
दर १५ दिवसांनी फेशियल करण्याचा सल्ला का दिला जातो ?
१५ दिवसांतून एकदा फेशियल केल्याने त्वचा स्वच्छ व साफ होण्यास मदत होते. फेशियल केल्याने त्वचेवरील छिद्रे स्वच्छ करण्यासोबतच मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. तसेच वेळोवेळी फेशियल केल्याने त्वचेवरील ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स दूर होऊन त्वचा नितळ दिसू लागते. त्वचेचे नुकसान करणाऱ्या या वाईट गोष्टी महिन्यातून दोनदा त्वचेतून बाहेर काढल्या गेल्यास त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार राहते.
कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...
तज्ज्ञ सांगतात...
१. त्वचारोगतज्ञ रश्मी शेट्टी फेशियल करण्याचा सल्ला देताना सांगतात की एखाद्या व्यक्तीने किती वेळा फेशियल करावे याबद्दल कोणताही निश्चित असा नियम नाही. जर एखाद्याची त्वचा कोरडी असेल तर महिन्यातून दोनदा फेशियल केल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होईल आणि चेहऱ्याला एक नवीन तजेलदार लूक प्राप्त होतो.
२. डॉक्टरांनी असेही सांगितले की ज्यांची त्वचा अशी आहे, ज्यांचे छिद्र लवकर बंद होतात, किंवा व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स दिसतात, त्यांनी १५ दिवसांतून एकदा तरी फेशियल करुन त्वचेची स्वच्छता करुन घ्यावी.
३. तसेच संवेदनशील त्वचेच्या लोकांना काळजीपूर्वक फेशियल करण्याचा सल्ला दिला आहे, कारण अशा त्वचेवर खूप लवकर जळजळ होते, ज्यामुळे त्वचेसंबंधित अधिक समस्या उद्भवू शकतात.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने फेशियल कसे करावे...
स्टेप १ : सर्वप्रथम, माईल्ड फेसवॉशने तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. स्टेप २ : घरी बनवलेल्या किंवा बाजारातून विकत घेतलेल्या स्क्रबने किमान ५ मिनिटे तुमच्या चेहेऱ्यावर स्क्रबिंग करुन घ्यावे. स्टेप ३ : चेहऱ्यावर गरम पाण्याने वाफ घ्या, जेणेकरुन यानंतर जे काही पदार्थ लावले जातील ते चांगले शोषले जातील.स्टेप ४ : तुमच्या चेहऱ्याला १० मिनिटे रिच मॉइश्चरायझरने मसाज करावा.
स्टेप ५ : चेहरा स्वच्छ केल्यानंतर घरी तयार केलेला किंवा बाजारातून आणलेला फेसपॅक किंवा फेसमास्क लावा. १५ मिनिटे ते चेहेऱ्यावर तसेच वाळू द्यावे. स्टेप ६ : कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर मॉइश्चरायझर क्रिम लावा.स्टेप ७ : तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बदामाचे तेल किंवा त्वचेला साजेसे कोणतेही आवश्यक तेल देखील लावू शकता.