Lokmat Sakhi >Beauty > Hair Fall: केस गळतात तेल लावा, पण तेल लावलं की जास्त गळतात? तेल लावताना टाळा ३ चुका

Hair Fall: केस गळतात तेल लावा, पण तेल लावलं की जास्त गळतात? तेल लावताना टाळा ३ चुका

Hair Care Tips: केस गळतात, मग डोक्याला तेल लावा.. असं आपल्याला सहज सांगितलं जातं.. पण तेल लावल्यानंतर (hair fall after oiling) तर जास्तच केस गळतात, असा काही जणींचा अनुभव आहे.. का बरं असं होत असावं, वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 05:31 PM2022-03-11T17:31:22+5:302022-03-11T17:35:19+5:30

Hair Care Tips: केस गळतात, मग डोक्याला तेल लावा.. असं आपल्याला सहज सांगितलं जातं.. पण तेल लावल्यानंतर (hair fall after oiling) तर जास्तच केस गळतात, असा काही जणींचा अनुभव आहे.. का बरं असं होत असावं, वाचा...

Why more hair fall after applying oil? 3 mistakes that should avoid | Hair Fall: केस गळतात तेल लावा, पण तेल लावलं की जास्त गळतात? तेल लावताना टाळा ३ चुका

Hair Fall: केस गळतात तेल लावा, पण तेल लावलं की जास्त गळतात? तेल लावताना टाळा ३ चुका

Highlightsज्यादिवशी केसांना तेल लावून मसाज केली जाते, त्यादिवशी उलट जास्त केस गळाल्याचा (hair fall problem) अनुभव येतो.नेमकं काय चुकतं आपलं ते जाणून घेणं गरजेचं आहे... 

केस गळण्याची समस्या आता एवढी वाढली आहे की जो- तो याबाबतची तक्रार करत असतो.. डोक्याची त्वचा कोरडी पडते त्यामुळे वारंवार केसांना तेल लावून त्वचा मॉईश्चराईज ठेवणं आणि केसांना तेलाच्या माध्यमातून पोषण देणं गरजेचं आहे, हे आपण जाणतो. पण होतं मात्र उलटंच. ज्यादिवशी केसांना तेल लावून मसाज केली जाते, त्यादिवशी उलट जास्त केस गळाल्याचा (hair fall problem) अनुभव येतो. एरवीपेक्षा दुप्पट- तिप्पट केस कंगव्यात गळालेले दिसून येतात. काय याची कारणं.. नेमकं काय चुकतं आपलं ते जाणून घेणं गरजेचं आहे... 

 

केसांना तेल लावताना हे चुकतंय का..(3 mistakes)
१. तेल लावून मसाज करण्याची चुकीची पद्धत हे तेल लावल्यानंतर केस गळण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे. अनेक जण मसाज करताना बोटांच्या टोकांचा नाही तर हाताच्या तळव्याचा वापर करतात. यामुळे डोक्याची त्वचा गरजेपेक्षा जास्त जोरात रगडली जाते. त्यामुळे केसांची मुळं सैल होतात आणि केस तुटतात. त्यामुळे मसाज नेहमी बोटांच्या टोकाने करा आणि ती ही हळूवार हातानेच.

 

२. तेल लावल्यानंतर अनेक जण केसांची घट्ट वेणी घालतात नाहीतर केस आवळून अंबाडा घालून टाकतात. आधीच त्रासले गेलेले केस यामुळे मग ओढले जातात आणि लगेच तुटतात. त्यामुळे तेल लावल्यानंतर ते आवळून बांधू नका. मोकळे सोडा किंवा अगदी सैलसर वेणी घाला. 

 

३. तेल लावल्यानंतर लगेचच केस विंचरण्याची घाई केली तरी ते तुटू शकतात. त्यामुळे तेल लावून मसाज केल्यानंतर एक ते दिड तासाने केस विंचरा. आधी हाताने केसांचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मग कंगव्याने अलगदपणे केस विंचरा. कमी केस गळतील.
 
 

Web Title: Why more hair fall after applying oil? 3 mistakes that should avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.