डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंबाचे गोड आंबट दाणे खाणे , डाळिंबाचं ज्यूस पिणे यापध्दतीने डाळिंबाच आपण उपयोग करतो. डाळिंबातील दाणे काढून झाले की त्याचे जाडे भरडे साल फेकून देतो. पण डाळिंबाच्या सालामधे आरोग्य आणि सौंदर्याचं रहस्य दडलेलं आहे. इतकंच नाही तर महिलांच्या आरोग्यासाठीही डाळिंबाच्या सालीचा उपयोग होतो. पाळीमधे जास्त रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर डाळिंबाच्या सालाचा घरगुती उपाय केला जातो.
नैसर्गिक घटकांद्वारे आपल्याला आपलं सौंदर्य वाढवायचं आणि जपायचं असेल तर केवळ डाळिंब खाऊन चालणार नाही. डाळिंबाच्या सालीचा उपयोगही करावा लागेल.
Image: Google
डाळिंबाच्या सालींचा सौंदर्योपचार
1. त्वचेच्या अनेक समस्यांमधे डाळिंबाच्या सालीचा उपयोग परिणामकारक ठरतो. डाळिंबाच्या सालीतील गुणधर्म त्वचेखाली जी कोलॅजनची निर्मिती होत असते त्याला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी डाळिंबाची साल हा उत्तम उपाय आहे.
यासाठी डाळिंबाची साल उन्हात सुकवावी आणि ती मिक्सरमधून वाटून घ्यावी. दोन चमचे डाळिंबाच्या सालीची पूड आणि त्यात थोडं दूध घालावं. त्वचा तेलकट असेल तर दुधाऐवजी त्यात गुलाबपाणी घालावं. ही पेस्ट चेहेर्यावर लावावी. सुकल्यानंतर चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा.
2 डाळिंबाच्या सालीचा उपयोग त्वचेचं प्रदूषणापासून आणि अन्य विषारी घटकांपासून संरक्षण करण्यासाठी करता येतो. तसेच त्वचेचा पीएच स्तराचं संतुलन राखण्याचं कामही डाळिंबाच्या सालीतील गुणधर्म करतात. डाळिंबाच्या सालीमधे एलाजिक अँसिड नामक घटक असतो तो त्वचेतील ओलावा धरुन ठेवतो. यामुळे त्वचा मऊ होते.
यासाठी उन्हात वाळवलेली डाळिंबाची सालं मिक्सरमधून वाटावी. एका वाटीत ही पावडर काढून घ्यावी. ही पावडर एक आठवडा सहज टिकते. दोन चमचे डाळिंबाच्या सालीची पावडर घ्यावी त्यात थोडं दही घालावं आणि ते चांगलं एकजीव करावं. हा लेप चेहेरा आणि मानेस लावावा. दहा मिनिटांनी चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
Image: Google
3. डाळिंबाच्या सालीत त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्याची क्षमत असते. तसेच डाळिंबाच्या सालीच्या उपयोगानं त्वचेचा कर्करोगही रोखला जातो. घरगुती सनस्क्रीनसारखा डाळिंबाच्या सालीचा उपयोग करता येतो.
यासाठी उन्हात वाळवलेल्या डाळिंबाच्या सालीची मिक्सरमधून पावडर करावी. घरातून बाहेर पडण्याआधीएक चमचा पावडर आपण लावतो त्या क्रीममधे मिसळून ती चेहेर्यावर लावावी.
4. केस गळती थांबवण्यासाठीही डाळिंबाच्या सालींचा उपयोग करता येतो. तसेच डोक्यातला कोंडाही याद्वारे घालवता येतो.
यासाठी उन्हात वाळवलेल्या डाळिंबाच्या सालीची पावडर करावी. ही पावडर केसांना लावतो त्या तेलात मिसळावी. हे तेल केसांच्या मुळांना लावून चांगला मसाज करावा. दोन तासांनी सौम्य शाम्पूने केस धुवावेत.