केस विंचरण्यासाठी किंवा केसांतील गुंता सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या आकाराच्या कंगव्यांचा वापर करतो. काहीवेळा केसांच्या विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करायच्या म्हटलं की आपण त्यानुसार कंगव्याचे प्रकार निवडतो. केसांचा आकार, पोत, प्रकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपण योग्य त्या कंगव्याची निवड करतो. केस विंचरण्यासाठी, केसांचे आरोग्य राखण्यासाठी, केसांतील गुंता सोडवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण रोज कंगव्याचा वापर करत असतो. कंगव्यासोबतच आजकाल केसांसाठी हेअर ब्रशचा देखील वापर केला जातो. केसांसाठी आपण हेअर ब्रश जरी रोज वापरत असलो तरी त्याच्या स्वच्छतेकडे आपण फार कमी लक्ष देतो. केसांसाठीचा कंगवा किंवा हेअर ब्रश रोज वापरत असलो तरीही स्वच्छता फारच क्वचित करतो(How to Clean a Hairbrush).
जर आपण देखील केसांसाठी हेअर ब्रशचा वापर करत असाल तर त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हेअर ब्रश वेळच्यावेळी स्वच्छ केला नाही तर त्यात काळा थर व केसांचा गुंता जमा होतो. असा अस्वच्छ हेअर ब्रश (How to Clean Your Dirty Hairbrush) जर आपण सतत वापरात राहिलो तर त्याचे हानिकारक परिणाम (How to Clean a Hairbrush in 6 Simple Steps) आपल्या केसांवर दिसू लागतात. अस्वच्छ हेअर ब्रशने केस विंचरलयास स्कॅल्प व केस यांना इंन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेअर ब्रश नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे(How to Clean Hair Brushes the Right Way).
हेअर ब्रश कितीवेळा स्वच्छ करावा ?
हेअर ब्रश कितीवेळा स्वच्छ करावा यापेक्षा तो घाण होणारच नाही याची अधिक काळजी घेणे सगळ्यांत महत्वाचे असते. केसांचा ब्रश घाण होण्याची वाट पाहू नये. प्रत्येक २ ते ४ आठवड्यांतून एकदा आपला हेअर ब्रश स्वच्छ करुन धुणे महत्वाचे असते. हा हेअर ब्रश धुताना सर्वप्रथम त्यात अडकलेला केसांचा गुंता काढून घ्यावा(How to Clean a Hairbrush in 6 Simple Steps).
हेअर ब्रश कसा स्वच्छ करावा ?
१. हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी टेल कोंब किंवा त्यासारख्या टोकदार वस्तूने त्यात अडकलेले केस व केसांचा गुंता काढून घ्यावा.
२. हे केस काढण्यासाठी चाकू, सूरी यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करु नका जेणेकरुन हेअर ब्रश खराब होईल.
देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...
३. त्यानंतर एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून हेअर शॅम्पू किंवा बेकिंग सोडा घालून त्याचे द्रावण तयार करुन घ्यावे.
४. या तयार केलेल्या द्रावणांत हेअर ब्रश १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावा त्यानंतर एका स्वच्छ टूथब्रशच्या मदतीने हा हेअर ब्रश हलक्या हाताने घासून स्वच्छ करावा.
केसांची वाढ खुंटली ? करा ५ सोप्या स्टेप्समध्ये मसाज, केसांच्या वाढीत होईल मदत...
केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...
५. त्यानंतर हा हेअर ब्रश पाण्याखाली धरून स्वच्छ धुवून घ्यावा.
६. आता टॉवेल किंवा कापडाच्या मदतीने हा हेअर ब्रश स्वच्छ पुसून कोरडा करुन घ्यावा.