Lokmat Sakhi >Beauty > तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? डॉक्टरांनी दिलं सोपं उत्तर!

तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? डॉक्टरांनी दिलं सोपं उत्तर!

Sunscreen Using Benefits : अनेकदा बघायला मिळतं की, अनेक तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीनचा वापर करण्यास सांगतात. याचंच कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:14 IST2024-12-24T11:12:12+5:302024-12-24T11:14:27+5:30

Sunscreen Using Benefits : अनेकदा बघायला मिळतं की, अनेक तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीनचा वापर करण्यास सांगतात. याचंच कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Why you should apply sunscreen and its importance? Doctor Aanchal Panth gives answer | तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? डॉक्टरांनी दिलं सोपं उत्तर!

तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? डॉक्टरांनी दिलं सोपं उत्तर!

Sunscreen Using Benefits : तरूणी आपल्या चेहऱ्यांची खूप काळजी घेतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा किंवा घरगुती उपायांचा वापर केला जातो. काही तरूणी अशाही असतात ज्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा फार वापर करत नाही. पण त्यांच्या पर्स एक प्रॉडक्ट नक्की असतं ते म्हणजे सनस्क्रीन. अलिकडे तर हेही बघायला मिळतं की, निटपणे चेहराही न स्वच्छ करणारे तरूण आजकाल बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. असंही अनेकदा बघायला मिळतं की, अनेक तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीनचा वापर करण्यास सांगतात. याचंच कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे.

तरूणी बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? हा प्रश्न अनेक तरूणांना पडत असेल. अशात यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया यानं डॉक्टर आंचल पंथ यांच्यासोबत केलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांना विचारलं की, भारतीय तरूणी आपल्या बॉयफ्रेन्डला सनस्क्रीन लावण्यास का सांगतात? चला जाणून घेऊ यावर डॉक्टर काय म्हणाल्या.

रणवीरनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत डॉक्टर म्हणाल्या की, 'सनस्क्रीन लावणं फार गरजेचं असतं. आपल्या त्वचेवर दोन थर असतात. वरच्या थराला एपिडर्मिस आणि खालच्या थराला हाइपोडर्मिस म्हटलं जातं.

एपिडर्मिसचा जो सगळ्यात खालचा भाग बेसल असतो, ज्यातील मेलानोसाइट्स मेलानिन बनवतात. जेव्हाही तुम्ही उन्हात जाता तेव्हा हे मेलोनोसाइड्स जास्त अ‍ॅक्टिव असतात. ज्यामुळे मेलानिन जास्त तयार होतं आणि त्यांचं डिस्ट्रिब्यूशनही जास्त होतं.

त्वचेमध्ये मेलेनिन वाढू नये यासाठी सनस्क्रीनचा वापर गरजेचा ठरतो. डॉक्टर आंचल म्हणाल्या की, मेलेनिनमुळे त्वचेवर डार्कनेस जास्त होते. त्यामुळे टॅनिंगपासून, काळ्या डागांपासून बचाव करायचा असेल तर सनस्क्रीनचा वापर करायला हवा. 

तसेच तुमच्या गर्लफ्रेन्डचं तुमच्यावर खूप प्रेम असतं आणि तिला वाटतं की, तुमच्यासारखी तुमची त्वचाही हेल्दी रहावी. यासाठी त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा सनस्क्रीन लावण्यास सांगत असतात.

Web Title: Why you should apply sunscreen and its importance? Doctor Aanchal Panth gives answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.