Lokmat Sakhi >Beauty > तीळ फक्त खाऊच नका, सुंदर त्वचेसाठी लावा तिळाचे पॅक! त्वचेच्या ड्रायनेसवर उत्तम उपाय

तीळ फक्त खाऊच नका, सुंदर त्वचेसाठी लावा तिळाचे पॅक! त्वचेच्या ड्रायनेसवर उत्तम उपाय

Home remedies and beauty tips: आरोग्यासाठी उपयुक्त असणारे तीळ सौंदर्य (beauty tips) वाढविण्यासाठीही भरपूर मदत करतात.. हिवाळ्यातल्या कोरड्या त्वचेसाठी (dry skin in winter) तर तिळाचा वापर अधिक प्रभावी ठरतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:01 PM2022-01-11T13:01:22+5:302022-01-11T13:14:49+5:30

Home remedies and beauty tips: आरोग्यासाठी उपयुक्त असणारे तीळ सौंदर्य (beauty tips) वाढविण्यासाठीही भरपूर मदत करतात.. हिवाळ्यातल्या कोरड्या त्वचेसाठी (dry skin in winter) तर तिळाचा वापर अधिक प्रभावी ठरतो. 

Winter care: Dry skin, dandruff and hair fall? Must use Sesame face pack and oil | तीळ फक्त खाऊच नका, सुंदर त्वचेसाठी लावा तिळाचे पॅक! त्वचेच्या ड्रायनेसवर उत्तम उपाय

तीळ फक्त खाऊच नका, सुंदर त्वचेसाठी लावा तिळाचे पॅक! त्वचेच्या ड्रायनेसवर उत्तम उपाय

Highlightsतिळामध्ये केस आणि त्वचा यांच्यादृष्टीने पोषक ठरणारे अनेक घटक असतात.आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आंघोळीच्या आधी तिळाचा असा वापर करून बघा.. 

एवढ्याशा तिळमध्ये असणारी ताकद जाणून घेऊन तिचा आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी (use of sesame for skin and hair) योग्य उपयोग करून घेतला तर सौंदर्य (use of til for skin and hair) आणि तब्येत याविषयीच्या अनेक समस्या सहज सुटू शकतात. हिवाळ्यात तर कोरड्या त्वचेची समस्या चांगलीच डोके वर काढते. त्वचा तर उलतेच पण डोक्याची त्वचा कोरडी होऊन डोक्यात कोंडा होण्याचा त्रास ही अनेकांना सतावतो. या दोन्ही समस्यांवर घरगुती आणि अगदी सोपा उपाय शोधत असाल, तर तिळाचे हे फायदे एकदा बघाच...

 

तिळामध्ये केस आणि त्वचा यांच्यादृष्टीने पोषक ठरणारे अनेक घटक असतात. त्यामध्ये जे एक विशिष्ट प्रकारचे ॲण्टीऑक्सिडंट असते (anti oxidants in sesame) ते त्वचेची विशेष काळजी घेणारे आणि त्वचेला मृदूपणा देणारे असते. शिवाय तिळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. ते सुद्धा त्वचा आणि केस या दोन्हींच्या दृष्टीने खूपच लाभदायी आहे. याशिवाय तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आंघोळीच्या आधी तिळाचा असा वापर करून बघा.. 

 

१. तिळाचं तेल (sesame oil for skin)
त्वचेचा पोत सुधारून त्वचा मऊ, मुलायम करण्यासाठी तिळाच्या तेलाचा चांगला उपयोग करता येतो. याशिवाय तिळाच्या तेलात एखाद्या सनस्क्रिन लोशनप्रमाणे अनेक गुणधर्म नैसर्गिक रित्याच उपलब्ध असतात असेही मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या १ तास आधी तिळाच्या तेलाने चेहऱ्याला तसेच संपूर्ण अंगाला मसाज करा. तिळाचं तेल उष्ण असल्याने ते त्वचेला उब देतं, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. यामुळे त्वचा तुकतुकीत आणि नितळ होण्यास मदत होते. मसाज झाल्यानंतर १ तासाने गरम पाण्याने आंघोळ करावी.

 

२. केसांसाठी करा असा उपाय (sesame oil for hair)
तिळाचं तेल जसं त्वचेसाठी चांगलं आहे, तसंच ते केसांसाठीही चांगले मानले जाते. हिवाळ्यात तिळाच्या तेलाने केसांना मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होण्यास आणि केसांचा पोत सुधारण्यास खूपच मदत होते.

पाठदुखी- कंबरदुखी आहे? आहारात तिळाचा समावेश करा, तीळ खाण्याचे 7 स्निग्ध फायदे

तिळाच्या तेलामुळे मसाज केल्यास केसांची मुळं पक्की होऊन केस गळती थांबण्यासही मदत होते. यासाठी तिळाचं तेल आणि खोबरेल तेल २: ३ या प्रमाणात एकत्र करा. हे तेल कोमट करा आणि त्यानंतर हलक्या हाताने केसांना मसाज करा. एक तासानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू लावून कोमट पाण्याने धुवून टाका. 

 

३. तिळाचं स्क्रब (home made sesame scrub)
तिळाचं स्क्रब हे चेहऱ्यासह सगळ्या अंगासाठीच उपयुक्त आहे. तिळाचं स्क्रब तयार करण्यासाठी दोन ते तीन टेबलस्पून तीळ दुधात भिजत टाका. रात्रभर तीळ दुधात भिजू द्या. दुसऱ्यादिवशी दुधात भिजलेले तीळ वाटीत उरलेल्या दुधासकट मिक्सरमधून फिरवा आणि त्याची थोडी जाडसर पेस्ट करा. या पेस्टमध्ये हळद टाका, अर्ध्या लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून तुमच्या चेहऱ्याला तसेच सगळ्या अंगाला लावा. त्वचेचा काळवंडलेपणा दुर होण्यास तसेच त्वचेचा पोत सुधारून त्वचा चमकदार होण्यास मदत होते.  


 

Web Title: Winter care: Dry skin, dandruff and hair fall? Must use Sesame face pack and oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.