Lokmat Sakhi >Beauty > जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, हिवाळ्यात त्वचेला लावते खास होममेड क्रिम.. तुम्हीही वापरून बघा

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, हिवाळ्यात त्वचेला लावते खास होममेड क्रिम.. तुम्हीही वापरून बघा

How To Get Rid of Dry Skin In Winter: हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) हिने एक खास होममेड ब्यूटी क्रिम सांगितलं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 02:41 PM2022-11-15T14:41:18+5:302022-11-15T14:42:22+5:30

How To Get Rid of Dry Skin In Winter: हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) हिने एक खास होममेड ब्यूटी क्रिम सांगितलं आहे. 

Winter Care Tips: How to make almond night cream? Juhi Parmar's beauty secret for glowing skin | जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, हिवाळ्यात त्वचेला लावते खास होममेड क्रिम.. तुम्हीही वापरून बघा

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, हिवाळ्यात त्वचेला लावते खास होममेड क्रिम.. तुम्हीही वापरून बघा

Highlightsनाईट क्रिम म्हणूनच त्याचा उत्तम वापर करता येतो. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो तसेच त्वचेचा टोन एकसारखा होण्यास मदत होते. 

थंडी पडली की त्याचा सगळ्यात आधी पहिला परिणाम दिसून येतो तो त्वचेवर. लगेचच त्वचा कोरडी (dry skin in winter) होऊ लागते. काही जणींची त्वचा कोरडी पडून काळवंडते. त्वचा एकदम निस्तेज दिसू लागते. त्यामुळे या दिवसांत त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. त्वचेला पोषण देऊन तिला कायम मॉईश्चराईज ठेवावं लागतं. म्हणूनच खास हिवाळ्यासाठी अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar's beauty secret) हिने तिचं एक खास ब्यूटी सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(How to make almond night cream?)

 

जुहीने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून यामध्ये तिने त्वचेसाठी पोषक ठरणारे घरगुती क्रिम कसे तयार  करायचे, याविषयीची माहिती शेअर केली आहे. हे क्रिम घरी तयार करायला अतिशय सोपे असून त्यासाठी  अगदी मोजके साहित्य लागते. शिवाय एकदा हे क्रिम करून ठेवलं की तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवून पुढील १५ दिवस वापरू शकता. नाईट क्रिम म्हणूनच त्याचा उत्तम वापर करता येतो. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो तसेच त्वचेचा टोन एकसारखा होण्यास मदत होते. 

 

कसं तयार करायचं अलमंड नाईटक्रिम?
साहित्य 

८ ते १० बदाम
२ टेबलस्पून गुलाबजल

फ्रोजन शोल्डरचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी सांगतेय ५ व्यायाम, करून बघा 
२ टीस्पून बदाम तेल
१ टीस्पून ॲलोव्हेरा जेल
२ व्हिटॅमिन ई कॅप्सूल

 

कृती
१. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा

२. सकाळी बदामाची साले काढून घ्या आणि बदाम मिक्सरमधून वाटून घ्या.

३. वाटलेल्या बदामामध्ये गुलाबजल टाका आणि ते पाणी गाळून घ्या.

कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

४. त्यात आता ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि बदाम तेल टाका.

५. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आणि काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

६. रोज रात्री झोपताना हे क्रिम लावून चेहऱ्याला मसाज करा. 

Web Title: Winter Care Tips: How to make almond night cream? Juhi Parmar's beauty secret for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.