Lokmat Sakhi >Beauty > भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल

भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल

Winter Feet Care Tips To Make Them Beautiful By Beauty Expert Shahnaz Husain : Heal your heels By Shahnaz Husain : Learn From Shahnaz Husain How To Take Care Of Feet In Winters : Follow Shahnaz Husain's Guide To Heal your heels during winters : हिवाळ्यात टाचांना भेगा पडू नये म्हणून ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन सांगतात 'या' खास तेलाने मालिश करण्याचा देसी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 18:09 IST2024-12-20T16:04:13+5:302024-12-20T18:09:20+5:30

Winter Feet Care Tips To Make Them Beautiful By Beauty Expert Shahnaz Husain : Heal your heels By Shahnaz Husain : Learn From Shahnaz Husain How To Take Care Of Feet In Winters : Follow Shahnaz Husain's Guide To Heal your heels during winters : हिवाळ्यात टाचांना भेगा पडू नये म्हणून ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन सांगतात 'या' खास तेलाने मालिश करण्याचा देसी उपाय...

Winter Feet Care Tips To Make Them Beautiful By Beauty Expert Shahnaz Husain Follow Shahnaz Husain's Guide To Heal your heels during winters | भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल

भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल

हिवाळ्यात पडणाऱ्या गुलाबी थंडी सोबतच अनेक आजारपण आणि इतर समस्या देखील सतावतात. थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात सतत अनेक बदल होत असतात. थंडीत वाढत्या गारव्यामुळे त्वचा कोरडी (Winter Feet Care Tips To Make Them Beautiful By Beauty Expert Shahnaz Husain) होण्याचा त्रास अनेकांना सतावतो. अशा परिस्थितीत, हात,पाय, ओठ यासोबतच पायांच्या टाचांची देखील त्वचा फाटली जाते. पायांच्या टाचांची त्वचा कोरडी पडणे आणि टाचांना भेगा पडणे अश्या समस्या निर्माण होतात. या ऋतूमध्ये आपल्या त्वचेचे अधिक जास्त नुकसान होते. पायांच्या टाचांना भेगा पडल्याने पायांचे सौंदर्य कमी होते(Follow Shahnaz Husain's Guide To Heal your heels during winters).

पायांच्या टाचांमधील भेगांमध्ये माती, पाणी गेल्यावर पायांमध्ये तीव्र वेदना जाणतात. अशा भेगा पडलेल्या टाचांसोबत रोजचे रुटीन फॉलो करणे वेदनादायक आणि त्रासदायक ठरु शकते. तेव्हा हिवाळ्यात पायांच्या तळव्यांना भेगा (How to Avoid Dry Cracked Heels in Winter) पडू नयेत आणि पायाची त्वचा मुलायम रहावी यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करु शकतो. सुप्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन यांनी हिवाळ्यात पायांच्या तळव्यांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. शहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या टिप्स (Learn From Shahnaz Husain How To Take Care Of Feet In Winters) फॉलो करून हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून मुक्ती मिळवू शकतो. यंदाच्या थंडीत टाचांना भेगा पडू नये म्हणून शहनाज हुसेन यांनी सांगितलेला हा खास उपाय एकदा नक्की ट्राय करुन पाहाच.

शहनाज हुसेन यांनी सांगितलेला खास उपाय कोणता ?

१. हिवाळयात वाढत्या गारठ्याने पायांच्या टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलने या भेगांवर हलकेच मालिश करून घ्यावे. ऑलिव्ह ऑईल त्वचेचे पोषण आणि ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित करण्यास मदत करते. कोमट ऑलिव्ह ऑईलमध्ये तीन ते चार थेंब लॅव्हेंडर एसेंशियल ऑईल मिसळा आणि पायाला लावा. यामुळे काही वेळात तुम्हाला खूप आराम वाटेल.

हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

२. गरम पाण्यात व्हाईट व्हिनेगर घाला आणि त्या पाण्यात तुमचे पाय ५ मिनिटे भिजवा. यानंतर, क्यूटिकलवर ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब लावा आणि सुमारे १० मिनिटे पाय पाण्यात भिजू द्यावेत. यामुळे पाय मऊ आणि लवचिक होतील. ऑलिव्ह ऑईल पायांच्या त्वचेला मॉइश्चराईझ करण्यास मदत करते आणि आपण हे तेल सौम्य मॉइश्चरायझर म्हणून देखील वापरू शकता. या तेलाच्या वापराने टाचांना भेगा पडण्यापासून प्रतिबंधित करते आणि मृत त्वचा देखील साफ करते. याशिवाय, ते तुमच्या पायांचे सांधे आणि स्नायू देखील मजबूत करते. 

डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

३. हिवाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी झोपण्यापूर्वी पायांना हलक्या हाताने मसाज करा. यासाठी एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल प्रमाणेच मोहरी किंवा खोबरेल तेल गरम करा. आता याने पायाची बोटे आणि बाकीच्या पायाला मसाज करा. यामुळे पायांचे रक्ताभिसरण वाढेल आणि पायांना उबदारपणा येईल. हिवाळ्यात पायांच्या काळजीसाठी हे देखील अधिक फायदेशीर ठरते .

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

४. हिवाळ्यात पायांचे व्यायाम करूनही पायाचे सौंदर्य वाढवता येते, पण हिवाळ्यात शरीराची क्रिया कमी झाल्यामुळे तळवे थंड पडतात. दररोज अर्धा तास व्यायाम करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. पायांच्या बोटांवर दाब देत उभे राहण्याचा प्रयत्न करा, त्यांनतर पुन्हा पायांच्या टाचां जमिनीला टेकवून उभे राहावे. यानंतर बसून दोन्ही पायाची बोटे घड्याळाच्या काट्याप्रमाणे १५ ते २० वेळा फिरवा. पायाच्या बोटांच्या साहाय्याने जमिनीवर पडलेला रुमाल किंवा कापड उचलण्याचा सरावही तुमचे पाय सक्रिय ठेवू शकतो.

५. हिवाळ्यात पायांच्या टाचांमध्ये घाण साचल्याने पाय घाण व खराब दिसू लागतात. यासाठी तुम्ही हिवाळ्यात पाय स्क्रब करू शकता. घरी स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा मीठ, एक चमचा दलिया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायाला लावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा.

Web Title: Winter Feet Care Tips To Make Them Beautiful By Beauty Expert Shahnaz Husain Follow Shahnaz Husain's Guide To Heal your heels during winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.