थंडीच्या दिवसांत हवेतील तापमान कमी झाल्याने साहजिकच हवा कोरडी होते. या कोरडेपणाचा आपल्या त्वचेवर परीणाम होतो त्याचप्रमाणे आपल्या केसांवरही याचा विपरीत परीणाम होतो. एरवी सिल्की-मुलायम असलेले आपले केस थंडीच्या दिवसांत अचानक कोरडे आणि रुक्ष व्हायला लागतात. त्वचा मुलायम राहण्यासाठी आपण थंडीच्या दिवसांत आवर्जून अभ्यंग स्नान करतो. त्वचेला मॉईश्चरायजर, तेल असे काही ना काही लावतो. त्यामुळे त्वचेतील ओलावा काही प्रमाणात टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडी झालेली त्वचा मुलायम दिसण्यास मदत होते (Winter Hair Care Tips Best Hair Mask to Keep Hair Healthy) .
केस सिल्की आणि मुलायम दिसावेत यासाठी आपण ते वारंवार धुतो. पण धुतल्याने त्याचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी जास्तच वाढतो. केमिकल्स असलेल्या शाम्पू आणि कंडीशनरमुळे असे होते. पण थंडीतही केस मुलायम आणि सिल्की राहावेत यासाठी केसांना ठराविक कालावधीने हेअर मास्क लावणे आवश्यक असते. या मास्कमुळे केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते आणि ऐन थंडीत केस कोरडे किंवा रुक्ष न होता मुलायम राहू शकतात. ब्युटी एक्सपर्ट रोहीत सचदेव सांगतात हा हेअरमास्क कसा तयार करायचा, कसा लावायचा याविषयी...
हेअर मास्क करण्याच्या स्टेप्स..
१. एका बरणीमध्ये साधारण ६ चमचे कोरफडीची जेल घ्यायची.
२. यामध्ये २ चमचे एरंडेल तेल आणि २ चमचे मध घालायचा.
३. हे सगळे घटक चांगल्या प्रकारे मिक्स करायचे.
४. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावून ठेवायचे.
५. साधारण ३० मिनीटे ते १ तास हे मिश्रण केसांवर तसेच ठेवायचे.
६. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस शाम्पू आणि कंडीशनरने धुवायचे.
७. किमान १५ दिवसांतून एकदा हा प्रयोग नक्की करायला हवा.
हेअर मास्कचे फायदे
१. केसांची चमक कायम राहण्यास मदत होते.
२. थंडीमध्ये होणारे केसांचे गळणे कमी होते.
३. केसांचे कंडीशनिंग करण्यासाठी कोरफड अतिशय फायदेशीर असते.
४. केस मजबूत होण्यासाठी एरंडेल तेलाचा चांगला फायदा होतो.
५. मधामुळे केस मुलायम, शायनी आणि बाऊन्सी होण्यास मदत होते.