Lokmat Sakhi >Beauty > Winter Health Tips : थंडीत अजिबात तहान लागत नाही? डिडायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून  ४ गोष्टी करा

Winter Health Tips : थंडीत अजिबात तहान लागत नाही? डिडायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून  ४ गोष्टी करा

Winter Health Tips : वातावरणातील बदलांमुळे घराबाहेर पडल्याने शरीरातील हायड्रेशनची पातळी घसरते आणि थकवा जाणवू लागतो. घरातून बाहेर पडताना स्वतःसोबत पाण्याची बाटली नक्की घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:30 AM2022-11-21T11:30:27+5:302022-11-21T11:35:07+5:30

Winter Health Tips : वातावरणातील बदलांमुळे घराबाहेर पडल्याने शरीरातील हायड्रेशनची पातळी घसरते आणि थकवा जाणवू लागतो. घरातून बाहेर पडताना स्वतःसोबत पाण्याची बाटली नक्की घ्या.

Winter Health Tips : How to prevent dehydration in winter | Winter Health Tips : थंडीत अजिबात तहान लागत नाही? डिडायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून  ४ गोष्टी करा

Winter Health Tips : थंडीत अजिबात तहान लागत नाही? डिडायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून  ४ गोष्टी करा

नोव्हेंबर महिन्यांमध्ये दिवसा तापमान अचानक खूप जास्त वाढते तर रात्री कमी होते. लक्षणीय बदलांच्या या काळात शरीरातील हायड्रेशन अर्थात पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. (Winter Health Tips) कारण वातावरणात गारवा असल्यानं तहान जास्त लागत नाही. म्हणूनच या लेखात डिहायड्रेशनचा त्रास टाळण्याचे काही सोपे उपाय पाहूया. (Winter Health Tips : How to prevent dehydration in winter) डॉ. प्रतीक्षा कदम कन्सल्टन्ट, डाएटिटिक्स अँड न्यूट्रिशन (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई) यांनी लोकमत सखीला याबाबत अधिक माहिती दिली आहे.

पाणी नेहमी जवळ ठेवा

वातावरणातील बदलांमुळे घराबाहेर पडल्याने शरीरातील हायड्रेशनची पातळी घसरते आणि थकवा जाणवू लागतो. घरातून बाहेर पडताना स्वतःसोबत पाण्याची बाटली नक्की घ्या. जितकी तहान लागेल तितके पाणी सतत पीत राहा. पाण्यामध्ये आवळा आणि लिंबू असे अँटीऑक्सिडंट्स देखील मिसळता येतील, ज्यामुळे शरीरातील हायड्रेशनची पातळी वाढेल. तुमचे शरीर डिहायड्रेट झाले आहे अथवा नाही हे समजून घेण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या लघवीचा रंग. अतिशय हलक्या, फिकट रंगाची लघवी होणे याचा अर्थ तुमच्या शरीराला आवश्यक तितके पुरेसे पाणी मिळत आहे.

थंड पेये, पदार्थ टाळा

शीतपेये प्यायल्याने तात्पुरते बरे वाटते पण वास्तव असे आहे की शीतपेयांमध्ये शर्करा खूप जास्त प्रमाणात असल्याने शरीर डीहायड्रेट होत जाते. अल्कोहोलिक पेये, चहा व कॉफीसारखी गरम किंवा साखर असलेली पेये तुमचे शरीर अजून जास्त डीहायड्रेट करू शकतात. अशा काळात शरीरामध्ये संतुलन राखण्याचा मार्ग म्हणजे भरपूर कोशिंबीरी व फळांचे सेवन करा कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असते.

फळे व भाज्यांचा आहारात समावेश करा

फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे असतात.  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाज्या व फळे आपल्या शरीराला हायड्रेट करतात. फळांमध्ये नारळाचे पाणी हा शरीर हायड्रेट करणारा सर्वात मोठा स्रोत आहे.  नारळाचे पाणी आपल्या शरीरामध्ये थंडावा राखते. यामध्ये आवश्यक खनिजे व इलेक्ट्रोलाईट्स असतात जी त्वचेला नवसंजीवनी मिळवून देतात. काकडीसारख्या भाज्यांमध्ये खूप प्रमाणात पाणी असते. शरीराला आवश्यक पोषके, ए आणि सी, फोलिक ऍसिड आणि फायबर या भाज्यांमधून मिळतात.

हिरव्या पालेभाज्या सुपरफूड मानल्या जातात कारण त्यांच्यामुळे शरीराला अनेक वेगवेगळे लाभ मिळतात. शरीर हायड्रेट करून शरीराचे तापमान कमी करण्याची क्षमता हिरव्या पालेभाज्यांमध्ये असते. अजून एक गुणकारी भाजी म्हणजे दुधी भोपळा. हायड्रेटिंग क्षमतेसाठी दुधी भोपळा जगभरात नावाजला जातो. यामध्ये भरपूर मॉइश्चर असते ज्यामुळे अतिरिक्त उष्णता कमी करण्यात मदत मिळते. त्याचप्रमाणे पचन व वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत देखीलदुधी भोपळा खूप उपयुक्त ठरतो

तुमच्या डॉक्टरांनी किंवा नोंदणीकृत डाएटिशियन्सनी जर काही कारणाने द्रव पदार्थ कमी प्रमाणात घेण्यास सांगितले असेल तर त्याबाबत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोला. शारीरिक कामे कमी करून किंवा व्यायामासाठी सकाळी लवकरची वेळ निवडून तुम्ही शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ न देता दिवसभर उर्जावान राहू शकाल

Web Title: Winter Health Tips : How to prevent dehydration in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.