Join us  

थंडीत मॉईश्चरायजर लावताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; त्वचा राहील कायम ग्लोईंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 10:24 AM

Winter Skin Care Tips about Applying Moisturizer : मॉईश्चरायजरची निवड करताना आणि ते लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

ठळक मुद्देआपल्या त्वचेला, शरीराला सूट होईल असेच मॉईश्चरायजर आपण निवडावे.मॉईश्चरायजर त्वचेमध्ये चांगले मुरल्यानंतर चेहरा किंवा हात पूर्ण कव्हर होतील अशी काळजी घेऊन मगच घराबाहेर पडायला हवे. 

थंडीच्या दिवसांत त्वचा खूप रुक्ष आणि कोरडी होते. कोरडी झालेली ही त्वचा मुलायम आणि ग्लोईंग व्हावी यासाठी आपण काही ना काही उपाय करतो. कोरडेपणामुळे त्वचा तडतडते आणि खाज येते. कोरडी त्वचा दिसायलाही चांगली दिसत नसल्याने आपण त्याला थंडीच्या दिवसांत आवर्जून मॉईश्चरायजर लावतो. पण मॉईश्चराजरचा इफेक्ट थोडा वेळ राहतो आणि काही वेळाने पुन्हा त्वचेला खाज येणे किंवा कोरडेपणा कायम राहतो. अशावेळी मॉईश्चरायजरची निवड करताना आणि ते लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे त्वचा तर चांगली राहीलच पण आपण लावत असलेल्या मॉईश्चरायजरचा चांगला उपयोगही होईल. तसेच मॉईश्चरायजर लावण्याबाबत आपल्याकडे काही गैरसमज असतात ते वेळीच दूर करुन योग्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूया मॉईश्चरायजरबाब कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची (Winter Skin Care Tips about Applying Moisturizer)....

(Image : Google)

१. नेमके कसे लावायचे?

आपण साधारणपणे सकाळी किंवा रात्री झोपताना मॉईश्चरायजर लावतो. ते ठिक आहे, पण मॉईश्चरायजर हे त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी असल्याने ते कोरड्या अंगावर लावल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे अंग ओले असताना त्यावर मॉईश्चरायजर लावायला हवे. त्यामुळे ते योग्यरितीने शरीरावर पसरते आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. म्हणून आंघोळ झाल्या झाल्या लगेचच मॉईश्चरायजर लावायला हवे. 

२. बाहेर पडताना मॉईश्चरायजर लावत असाल तर...

काही जण घराबाहेर पडताना चेहरा कोरडा दिसत असल्याने मॉईश्चरायजर लावतात. बाहेर जाताना त्वचा तात्पुरती एकसारखी दिसण्यासाठी याचा उपयोग होतोही. पण बाहेरील धूळ किंवा प्रदूषण हे या चेहऱ्यावर चिकटल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे मॉईश्चरायजर त्वचेमध्ये चांगले मुरल्यानंतर चेहरा किंवा हात पूर्ण कव्हर होतील अशी काळजी घेऊन मगच घराबाहेर पडायला हवे. 

(Image : Google)

३. निवड कशी करावी? 

बाजारात सध्या सौंदर्यप्रसाधनांच्या असंख्य कंपन्यांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यात बरीच स्पर्धाही आहे. त्यामुळे आपले प्रॉडक्ट कसे चांगले आहे हे सांगण्यासाठी या कंपन्या बरीच जाहिरात करताना दिसतात. मात्र आपल्या त्वचेला, शरीराला सूट होईल असेच मॉईश्चरायजर आपण निवडावे. एखाद्या स्थानिक कंपनीच्या मॉईश्चरायजरमध्ये त्वचेला हानिकारक असे घटक असतील तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच मॉईश्चरायजरमुळे त्वचा काळी पडली अशी तक्रारही काही जण करताना दिसतात. त्यामुळे याची निवड करताना आपण सतर्क असायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी