Lokmat Sakhi >Beauty > चेहरा खेचल्यासारखा-त्वचा कोरडी झाली? शहनाज हुसैनाच्या ७ टिप्स, थंडीत चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा खेचल्यासारखा-त्वचा कोरडी झाली? शहनाज हुसैनाच्या ७ टिप्स, थंडीत चेहऱ्यावर येईल तेज

Winter Skin Care Tips by Shahnaz Husain (dry skinsathi upay sanga) : हिवाळ्यात ओठ फाटणं, चेहरा ताणल्यासारखा वाटणं, चेहऱ्यावर मेकअप सेट न  होणं अशा समस्या उद्भवतात. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी  विंटर केअर टिप्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:44 PM2023-12-02T20:44:05+5:302023-12-02T20:45:34+5:30

Winter Skin Care Tips by Shahnaz Husain (dry skinsathi upay sanga) : हिवाळ्यात ओठ फाटणं, चेहरा ताणल्यासारखा वाटणं, चेहऱ्यावर मेकअप सेट न  होणं अशा समस्या उद्भवतात. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी  विंटर केअर टिप्स पाहूया.

Winter Skin Care Tips by Shahnaz Husain : Winter Beauty Tips by Shahnaz Husain Normal to Dry Skin | चेहरा खेचल्यासारखा-त्वचा कोरडी झाली? शहनाज हुसैनाच्या ७ टिप्स, थंडीत चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा खेचल्यासारखा-त्वचा कोरडी झाली? शहनाज हुसैनाच्या ७ टिप्स, थंडीत चेहऱ्यावर येईल तेज

हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेत बरेच बदल दिसून येतात. शरीरावरच नाही तर त्वचेवरही बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. रासायनिक प्रदूषकांमुळे त्वचेवर एंजिग साईन्स दिसून येतात. (Winter care for skin) त्वचा कोरडी पडणं, जळजळ, भेगा पडणं, एलर्जी होणं अशी लक्षणं जाणवतात. (dry skinsathi kay karave) त्वचेची काळजी घेण्यासाठी शहनाज  हुसैन यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. शहनाज हुसैन नेहमीच वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी खास टिप्स  शेअर करत असतात. हिवाळ्यात ओठ फाटणं, चेहरा ताणल्यासारखा वाटणं, चेहऱ्यावर मेकअप सेट न  होणं अशा समस्या उद्भवतात. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी  विंटर केअर टिप्स पाहूया. (Winter Skin Care Tips)

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी शहनाज हुसैन यांची खास टिप्स

१) ग्रीन टी सुद्धा त्वचेचा टोन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये ग्रीन टी चा वापर केला जातो. 

२) तुमच्या त्वचेवर दाणे किंवा फोड आले असतील तर चंदनाच्या लेपमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहऱ्याला लावा नंतर १५ मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

३) आजकाल त्वचा डिटॉक्सफाय करण्यासाठी एक्टिव्हेटेट चारकोलचा वापर केला जातो. एक्टिव्हेटेड चारकोल एलोवेरा जेल आणि गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका.

डोक्यावर पांढरे केस जास्त चमकतात? किचनमधला हा पदार्थ वापरा-एकही केस पांढरा होणार नाही

४) आठवड्यातून दोन वेळा त्वचेवर स्क्रब लावा. स्क्रबसाठी सुकलेली पुदिन्याची पानं आणि मध  घ्या. तीळ हलके वाटून घ्या आणि त्यात सुकी पुदिन्याची पानं घालून पावडर बनवून घ्या. यात थोडं मध मिसळून त्वचेवर लावा. ५ मिनिटं तसं सोडून द्या. हळूहळू रगडून चेहरा धुवा.

५) तिळामध्ये उन्हापासून बचाव करणारे गुण असतात ज्यामुळे त्वचेला आराम मिळतो. पुदिन्यात एंटी सेप्टीक गुण असतात यामुळे रॅशेज येत नाहीत.

बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स घरीच करा; सोपी पद्धत, एकदा खाल तर खातच राहाल

६) कोरडी त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लिंजिंग फार महत्वाचे आहे. त्वचा कोरडी असेल तर क्रिम किंवा जेल बेस्ड क्लिंजिंग मिल्क किंवा फेस वॉशचा वापर करा. तेलकट त्वचेसाठी फेशियल स्क्रब देखिल वापरू शकता.

७) तेलकट त्वचेसाठी फेशियल स्क्रब देखील वापरा. गुलाब पाण्यात कापूस बुडवून चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.

Web Title: Winter Skin Care Tips by Shahnaz Husain : Winter Beauty Tips by Shahnaz Husain Normal to Dry Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.