थंडीच्या दिवसांत चेहऱ्याची त्वचा खेचल्यासारखी आणि निस्तेज दिसते. चेहऱ्याचा ग्लो कमी होतो. स्किन केअर प्रत्येक हंगामासाठी गरजीचे असते. (Beauty Tips) पण वेळीच त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचेत ड्रायनेस, खाज, डार्कनेस आणि डाग-पिंपल्स येतात. जर हिवाळ्याच्या दिवसांत तुम्हाला त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. (How To Use Coconut Oil On Face) रोज हे तेल लावल्यानं चेहरा नेहमी चमकदार दिसतो आणि डाग कमी होण्यास मदत होते. (Coconut Oil On Face Daily Instant Glow)
चेहऱ्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर
अनेक रिसर्चमधून दिसून आले आहे की नारळाचं तेल गुणकारी ठरते. जे त्वचेसाठी बरेच फायदेशीर ठरते. हे तेल लावल्यानं स्किनचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. हे नॅच्युरल मॉईश्चराईजिंगचे काम करते. सेंसिटिव्ह जागा जसं की डोळ्यांच्या खाली, ओठांना लावू शकता. काही दिवसांतच तुम्हाला सुंदर चेहरा मिळेल.
नारळाच्या तेलात फॅटी एसिड असते जे त्वचेला हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते आणि आतून त्वचा हेल्दी होते.
हिवाळ्याच्या दिवसांत हे तेल लावल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे एक्ने, डाग दूर करण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्याची घाण पूर्णपणे साफ होते. नारळाच्या तेलानं पूर्णपण डाग दूर करण्यास मदत होते.
नारळाच्या तेलातील एंटी ऑक्सिडेंट्सने त्वचेतील सुरकुत्या कमी होतात. डाग कमी होतात आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते.
नारळाच्या तेलातील एसपीएफ त्वचेला सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचवते आणि आतून त्वचा डॅमेज होत नाही. ज्यामुळे चेहऱ्याचा ऊन्हापासून बचाव होण्यास मदत होते. नारळाच्या तेलातील एंटी इंफ्लेमेटरी गुण त्वचेच्या डागांना दूर करते आणि चेहरा मोकळा आणि सुंदर दिसतो.
नारळाच्या तेलाचा वापर कसा करावा?
रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला नारळाचं तेल लावा. चेहरा व्यवस्थित साफ करून नारळाचं तेल लावा. नारळाचं तेल तुम्ही हाता-पायांनाही लावू शकता. नारळाचं तेल केसांनाही लावू शकता. यामुळे केस सॉफ्ट, सिल्की, चमकदार बनतात.