Join us  

ऐन थंडीत त्वचा मुलायम ठेवायची तर करा १ सोपा उपाय; तज्ज्ञ सांगतात, कोरडेपणा-खाज होईल दूर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2023 4:08 PM

Winter Skin Care Tips : थंडीच्या दिवसांत सगळ्यात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे त्वचेचा कोरडेपणा.

ठळक मुद्देआयुर्वेदातील पारंपरिक उपाय आरोग्याच्या समस्यांसाठी केव्हाही चांगलेकेमिकल्स असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा सौंदर्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केव्हाही चांगला

आपली त्वचा कायम अभिनेत्रींप्रमाणे मुलायम आणि चमकदार असावी असं आपल्या प्रत्येकीला वाटतं. मात्र काही ना काही कारणांनी आपली त्वचा खराब होते आणि मग आपणही ती निस्तेज झाली, काळवंडली म्हणून तक्रारी करत राहतो. कधी त्वचेवर फोड येणे, डाग पडणे, सुरकुत्या येणे यांसारख्या तक्रारी तर अगदीच कॉमन असतात. पण थंडीच्या दिवसांत सगळ्यात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. हवेत गारठा वाढल्याने आर्द्रता कमी होते आणि त्वचेचा कोरडेपणा वाढायला लागतो (Winter Skin Care Tips Abhyanga).  

एकदा त्वचा कोरडी व्हायला लागली की खाज येणे, कोंडा पडणे आणि त्वचा तडतडणे अशा समस्या निर्माण होतात. आता यावर उपाय म्हणून आपण थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मॉईश्चरायजर वापरतो. पण त्याचा इफेक्ट ठराविक काळासाठीच राहतो. काही वेळाने त्वचा पुन्हा जैसे थे होते आणि तडतडायला सुरुवात होते. असे होऊ नये म्हणून काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्यावरचा एक सोपा आणि सहज करता येईल असा उपाय पाहणार आहोत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मिहीर खत्री यांनी याच्याशी निगडीत एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. थंडीतही त्वचा मुलायम राहावी यासाठी एक छान उपाय ते यामध्ये सांगतात. 

१. थंडीच्या दिवसांत वाताच्या समस्या वाढतात. तसेच त्वचा कोरडी होणे, केस कोरडे, सांधेदुखी होणे अशा तक्रारी भेडसावतात. 

२. यासाठी सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे मसाज.

३. आता हा मसाज कोणत्या तेलाने करायचा तर तीळाच्या तेलाने. वातशमन करण्यासाठी तिळाचे तेल अतिशय फायदेशीर असते. 

४. तिळाचे तेल कोमट करुन संपूर्ण अंगाला लावावे आणि मग कोमट पाण्याने आंघोळ करावी. 

५. आता तिळाच्या तेलाने मसाज आणि आंघोळ म्हटल्यावर रोज एक तास लागेल असे आपल्याला वाटू शकते. पण इतका वेळ मसाज करण्याची गरज नाही. अवघे ५ ते १० मिनीटे हा मसाज केला तरी चालतो. 

६. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा केलं तर याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे हा उपाय नियमितपणे रोजच्या रोज करायला हवा.

७. रोजच्या रोज संपूर्ण शरीराला तेल लावायला वेळ नसेल तर थंडीच्या दिवसांत किमान कान, डोकं आणि पायाला तरी या तेलाने जरुर मसाज करायला हवा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी