Join us  

थंडीत त्वचा कोरडी-चेहरा खेचल्यासारखा दिसतो? झोपताना 5 टिप्स फॉलो करा-मुलायम राहील त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 8:02 PM

Winter Skin Care Tips (Hiwalyat skinchi kalji kashi ghyavi) :

थंडीच्या दिवसात सगळ्यात जास्त परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्याच्या दिवसांत हवेमुळे स्किन ड्राय पडते आणि त्वचा निस्तेज दिसून लागते. (Winter Skin Care Tips) धूळ,  मातीमुळे स्किनवर परिणाम होतो म्हणून स्किन केअर गरजेची असते. डे स्किन केअरप्रमाणेच नाईट स्किन केअरही  गरजेची असते.  हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा त्वचेववर पिंपल्स, रिंकल्स येऊ शकतात चेहरा खेचल्यासारखा वाटतो. सिंपल स्किन केअर टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची त्वचा मॉईश्चराईज राहील आणि ग्लो येईल. (Hiwalyat skin dry hou naye upay in marathi)

हिवाळ्यात त्वचा खराब होऊ नये म्हणून लोक गरम पाण्याचा वापर करातात पण स्किनसाठी गरम पाण्याचा वापर नुकसानकारक ठरू शकतो. यामुळे त्वचेवर सूज येणं, जळजळ, खाज अशा समस्या उद्भवू शकतात. तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करू शकता.  ज्यामुळे त्वचा साफ राहील आणि त्वचेसंबंधित समस्या उद्भवणार नाहीत.

१) हिवाळ्याच्या दिवसांत  एक दिवसाआड तुमची  त्वचा एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. असं केल्याने त्वचेवर डेड स्किन सेल्स जमा होत नाहीत यामुळे स्किन सॉफ्ट राहते. यासाठी तुम्ही घरी बनवलेलं स्क्रब किंवा बाजारातून आणलेलं स्क्रब वापरू शकता. ओट्स,  कॉफी किंवा नारळाच्या तेलात मिसळून तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करू शकता. 

थंडीत केस गळणं वाढलंय-विंचरताना तुटतात? जावेद हबीब सांगतात 'या' तेलाने मसाज करा, दाट होतील केस

२) चेहऱ्यावर मसाज करा. रात्र असो किंवा दिवस हिवाळ्याच्या दिवसात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि आळस दूर ठेवण्यासाठी तुम्ही फेस मसाज करायला हवी. यासाठी तुम्ही  एलोवेरा जेल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.

३) रात्री झोपण्याआधी त्वाचा मॉईश्चराईज करायला विसरू नका.  तेल, जेल किंवा क्रिमचा वापर करा. अल्ट्रा हायड्रेटिंग मॉईश्चरायजर हिवाळ्यात सगळ्यात उत्तम ठरतं. तुम्ही हे मॉईश्चरायजर हाता-पायांसह त्वचेवरही लावू शकता.

४) झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित क्लिन करणं गरजेचं असतं.  यासाठी तुम्ही नारळाचे तेल, कच्च दूध किंवा कोणत्याही क्लिंजरचा वापर करू शकता. 

समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस

५) रात्री तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार नाईट क्रिम लावून झोपा. यामुळे त्वचा  कोरडी न पडता मॉईश्चराईज राहते. जर तुम्हाला नाईट क्रिम लावायला आवडत नसेल तर कमीत कमी रात्री चेहरा स्वच्छ धुवून झोपा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजी