Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो..

हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो..

Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने काळवंडली (solution for dry skin in winter) असेल तर हा एक उपाय करून बघा. फक्त ४ ते ५ पदार्थ वापरून घरीच तयार करा खास विंटर स्पेशल केशर क्रिम (Winter special Keshar or saffron cream).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 04:39 PM2022-12-29T16:39:15+5:302022-12-29T16:43:36+5:30

Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने काळवंडली (solution for dry skin in winter) असेल तर हा एक उपाय करून बघा. फक्त ४ ते ५ पदार्थ वापरून घरीच तयार करा खास विंटर स्पेशल केशर क्रिम (Winter special Keshar or saffron cream).

Winter special home made Keshar or saffron cream for glowing skin | हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो..

हिवाळ्यासाठी खास होममेड केशर क्रिम! टॅनिंग होईल कमी आणि त्वचेवर येईल मस्त गोल्डन ग्लो..

Highlightsरोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा. केशर क्रिमने चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा. काही दिवस नियमितपणे वापर केल्यास त्वचेचं काळवंडलेपण दूर होईल आणि त्वचेवर एक छान चमक येईल. 

थंडीचा कडाका वाढू लागला की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतोच. त्वचा काेरडी पडते (dry skin), डिहायड्रेशन होऊ लागतं आणि त्यामुळे मग त्वचा काळी पडलेली दिसू लागते. तसेच अगदीच निस्तेज होऊन त्वचेवरचा सगळा ग्लो गेल्यासारखा वाटतो. त्वचेचा असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर हा एक घरगुती उपाय करून बघा. यामध्ये त्वचेला पोषण देऊन तिला चमकदार (home remedies for glowing skin) करणारं केशर क्रिम (Winter special Keshar or saffron cream) घरच्याघरी कसं तयार करायचं ते पाहूया...

कसं करायचं त्वचेसाठी खास केशर क्रिम?
१. हिवाळ्यात त्वचेला हायड्रेटेड ठेवून चमकदार बनविणारं केशर क्रिम घरच्याघरी कसं तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mydelishbowl या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय 

२. यासाठी आपल्याला ८ ते १० केशराच्या काड्या, २ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल, २ टेबलस्पून गुलाब पाणी, १ टेबलस्पून बदाम तेल, व्हिटॅमिन ई च्या २ ते ३ कॅप्सूल एवढं साहित्य लागणार आहे.

३. सगळ्यात आधी केशराच्या काड्या एका कागदात गुंडाळा आणि हा कागद तापलेल्या तव्यावर एखाद्या मिनिटासाठी ठेवा. यामुळे केशराला चांगला शेक बसेल.

 

४. यानंतर गरम झालेलं केशर एका वाटीमध्ये काढा. त्यात गुलाब पाणी, ॲलोव्हेरा जेल, बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.

५. सगळं मिश्रण ५ ते ७ मिनिटे व्यवस्थित एकत्र करून हलवून घेतलं की केशर क्रिम झालं तयार.

कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप, बघा कसं लावायचं आणि कशी घ्यायची काळजी?

६. हे क्रिम काचेच्या बाटलीत भरून ६ ते ७ दिवसांसाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता.

७. रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा. केशर क्रिमने चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा. काही दिवस नियमितपणे वापर केल्यास त्वचेचं काळवंडलेपण दूर होईल आणि त्वचेवर एक छान चमक येईल. 

 

 

Web Title: Winter special home made Keshar or saffron cream for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.