हिवाळ्यात स्किन टॅनिंगची (Skin Tanning) समस्या कॉमन आहे. अनेकांची स्किन काळवंडते. हात - पाय काळवंडल्यावर आपल्या फुल बाह्यांचे कपडे घालायला लागतात (Winter Season). पण हिवाळ्यात स्किन का काळी पडते? यावर उपाय म्हणून आपण थेट ब्यूटी पार्लर गाठतो. पण ब्यूटी पार्लरमध्ये न जाता, आपण काही घरगुती उपायही करून पाहू शकता.
थंडी वाढले की, स्किन काळवंडते. डेड स्किनमुळे त्वचा अधिक काळपट दिसू लागते. अनेकदा फक्त हात आणि पाय टॅन होतात. जर आपल्याला खर्च न करता टॅनिंग काढायची असेल तर, कापूर आणि शाम्पूचा वापर करून टॅनिंग काढू शकता. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही. अगदी कमी साहित्यात टॅनिंग निघू शकते(Winter tanning and DIY Home remedies to avoid Body Tan).
टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय
लागणारं साहित्य
कापूर
कॉफी पावडर
लिंबू
कपाळावर काळेपणा - मुरुमांचे डाग निघतच नाहीत? दुधात १ गोष्ट कालवून लावा; त्वचेवर येईल नैसर्गिक चमक
खोबरेल तेल
शाम्पू
साखर
अशा पद्धतीने काढा हाता - पायाचे टॅनिंग
- सर्वात आधी एक वाटी घ्या. त्यात कापूर पावडर, पिठी साखर आणि कॉफी पावडर घालून मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस, खोबरेल तेल आणि १ चमचा शाम्पू घालून एकजीव करा. मिसळल्यानंतर तयार पेस्ट हात आणि पायांना लावा.
पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट
- या डी टॅन पॅकमुळे हाता - पायांचे डेड स्किनही निघून जाईल. १० मिनिटांसाठी डी टॅन पॅक स्किनवर ठेवा. नंतर हातानेच स्क्रब करा. ५ मिनिटे स्क्रब केल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.
- पहिल्याच दिवशी हलके रिझल्ट दिसेल. उत्तम रिझल्टसाठी आपण आठवड्यातून एकदा याचा वापर करू शकता. यामुळे नक्कीच लवकर हाता - पायाचे टॅनिंग निघेल. शिवाय स्किन मुलायम आणि चमकदार दिसेल.