Lokmat Sakhi >Beauty > केमिकलवाले शाम्पू कशाला, दह्यानं धुवा केस! दह्यानं केस धुण्याचे 4 फायदे-केस तलम-सुंदर

केमिकलवाले शाम्पू कशाला, दह्यानं धुवा केस! दह्यानं केस धुण्याचे 4 फायदे-केस तलम-सुंदर

शाम्पू ऐवजी दह्याचा वापर केल्यास केसांना (curd for hair) विविध फायदे मिळतात. दह्यानं केस धुणं (washing hair with curd) ही नवीन पध्दत नसून ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ज्या काळात केस धुण्यासाठी शाम्पू, कंडिशनर नव्हते त्याकाळात केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी दह्याचाच वापर केला जायचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 03:09 PM2022-08-18T15:09:49+5:302022-08-18T15:23:54+5:30

शाम्पू ऐवजी दह्याचा वापर केल्यास केसांना (curd for hair) विविध फायदे मिळतात. दह्यानं केस धुणं (washing hair with curd) ही नवीन पध्दत नसून ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ज्या काळात केस धुण्यासाठी शाम्पू, कंडिशनर नव्हते त्याकाळात केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी दह्याचाच वापर केला जायचा.

Wonderful benefits of applying curd for hair wash | केमिकलवाले शाम्पू कशाला, दह्यानं धुवा केस! दह्यानं केस धुण्याचे 4 फायदे-केस तलम-सुंदर

केमिकलवाले शाम्पू कशाला, दह्यानं धुवा केस! दह्यानं केस धुण्याचे 4 फायदे-केस तलम-सुंदर

Highlightsकेस मजबूत करण्यासोबतच केसांची वाढ होण्यासाठी, नवीन केस उगवण्यासाठी दह्याचा उपयोग होतो.दह्यामुळे केसांचं खोलवर माॅश्चरायझिंग होतं.आधी केसांना दह्याचा लेप लावून केस धुताना पुन्हा दही वापरल्यास केसांना चांगलं पोषण मिळतं.

आहारात दह्याचा समावेश केल्यानं आरोग्यास अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असल्यानं दह्यामुळे (curd benefits to health)  हाडं मजबूत होतात आणि आरोग्यही सुदृढ राहातं. दह्यामध्ये कॅल्शियम बरोबरच मॅग्नेशियम, बी5 आणि ड जीवनसत्वं, झिंक, प्रथिनं आणि पोटॅशियम सारखे आरोग्यास लाभदायी घटक असतात. दह्यातील या गुणधर्मांमुळेच खाण्यासोबतच त्वचा निरोगी करण्यासाठीही दह्याचा वापर केला जातो. पण त्वचेसोबतच केस धुण्यासाठीही शाम्पू ऐवजी दह्याचा वापर केल्यास (curd for washing hair)  केसांना विविध फायदे मिळतात. दह्यानं केस धुणं ही नवीन पध्दत नसून ती फार पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ज्याकाळात केस धुण्यासाठी शाम्पू, कंडिशनर नव्हते त्याकाळात केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी दह्याचाच (benefits of  washing hair with curd)  वापर केला जायचा. 

Image: Google

दह्याने केस धुतल्यास..

1. दह्यामध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असल्यानं केसातील कोंड्याची समस्या निघून दूर होते. केसात कोंडा असल्यास एक छोटा चमचा बेसन आणि त्यात अर्धा कप दही घालावं. हे दोन्ही एकत्र करुन हे मिश्रण केसांच्या मुळांशी आणि केसांना लावावं. हे मिश्रण लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

2. केस मजबूत करण्यासोबतच केसांची वाढ होण्यासाठी, नवीन केस उगवण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. दह्यामुळे केसांचं खोलवर माॅश्चरायझिंग होतं. दह्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस वाढतातही.

Image: Google

3. केस दह्याने धुतल्यास केसांचं डीप कंडिशनिंग होतं. दह्यातील गुणधर्मांमुळे केसांना पोषण मिळतं. केस चमकदार होतात. या फायद्यासाठी एक कप दही घ्यावं. त्यात 2 चमचे मध घालून ते दह्यात एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण केसांना लावावं. 20 मिनिटानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. दही लावून केस धुतल्यानं केस मऊ मुलायम आणि चमकदार होतात.

4. केसांसाठी अयोग्य हेअर प्रोडक्टस वापरल्यानं, वातावरण बदलल्यानं किंवा केस जास्त काळ बांधलेले ठेवल्यानं डोक्यात खाज येण्याची समस्या निर्माण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास केसांची मुळं कमजोर होतात. ही समस्या घालवण्यासाठी दह्यात लिंबू पिळावं आणि मग हे मिश्रण केसांना लावावं. 20- 25 मिनिटानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

Image: Google

केसांना दही कसं लावावं?

आधी केसांना दह्याचा हेअर मास्क लावून नंतर केस दह्यानं धुतल्यास केसांना चांगला फायदा मिळतो. दह्यात बेसन/ मध/ लिंबू मिसळून लावल्यास दह्यासोबत या घटकातील गुणधर्मांचाही केसांना लाभ होतो. केसांना दही लावताना आधी दही फेटून घ्यावं, मग केसांचे छोटे छोटे भाग करुन केसांच्या मुळांना आणि केसांना दही लावावं. दही लावल्यानंतर 15-20 मिनिटांनी शाम्पू ऐवजी केसांना दही लावून केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

Web Title: Wonderful benefits of applying curd for hair wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.