Lokmat Sakhi >Beauty > फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय

फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय

Worried about hair fall? These seeds can be added to the diet केस गळण्याच्या समस्येनं हैराण असाल तर हे सोपे चारोळी स्पेशल उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 01:27 PM2023-05-30T13:27:46+5:302023-05-30T13:28:25+5:30

Worried about hair fall? These seeds can be added to the diet केस गळण्याच्या समस्येनं हैराण असाल तर हे सोपे चारोळी स्पेशल उपाय करा.

Worried about hair fall? These seeds can be added to the diet | फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय

फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय

हेअर फॉलच्या समस्येमुळे अधिकतर लोकं त्रस्त आहेत. हेअर फॉल अनेक कारणांमुळे होते. हेअर फॉलमुळे केस पातळ व निर्जीव दिसतात. ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब दिसतो. अनेकदा स्त्रिया केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे हेअर सीरम, विविध तेल व इतर महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात.

पोषक तत्वांच्या कमतरतामुळे देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत महागडे प्रॉडक्ट्सचा आपल्या केसांवर काहीच परिणाम होणार नाही. केसांची योग्य निगा राखण्यासाठी पौष्टीक आहार व केसांना पोषण मिळतील असे प्रॉडक्ट्सचा वापर करणे गरजेचं आहे(Worried about hair fall? These seeds can be added to the diet).

केस असो किंवा स्किन याचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. केस व त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी आहारात पौष्टीक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण  आहारात चारोळीचा समावेश करू शकता. या बियांच्या सेवनामुळे केस गळती कमी होते. व केसांच्या री - ग्रोथसाठी मदत होते. या बियांच्या बाबतीत माहिती, डायटिशियन नेहा महाजन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

केसांची वेणी दिसेल जाड, कांद्याचा करा हेअर सीरम, केसांची समस्या होईल छुमंतर

चारोळी खाण्याचे फायदे

चारोळीमध्ये लोह, कॅल्शियम यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात चांगले फॅट्सही मुबलक प्रमाणात असतात.

केस मजबूत करण्यासाठी व केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करते.

चारोळीमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या मुळांमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते.

चारोळी बिया खाण्यासोबतच त्याचे तेल लावल्याने केसांची वाढ होते.

केसांव्यतिरिक्त, हे पचनसंस्थेसाठी देखील उत्तम मानले जाते.

चारोळीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते व शरीराला उर्जा मिळते.

चारोळी कसे खावे?

२ चमचे चारोळी एका कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.

सकाळी उठल्यानंतर या बिया खाव्यात.

केस गळतीने वैतागून रडकुंडीला आला असाल तर करा १ चमचा अळीवाचा सोपा उपाय, फायदेच फायदे

ही प्रोसेस ४ आठवड्यांपर्यंत करा.

या उपायामुळे केस गळतीची समस्या कमी होईल, व नवीन केसांच्या वाढीस मदत मिळेल.

Web Title: Worried about hair fall? These seeds can be added to the diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.