सुरकुत्या फक्त डोळ्याभोवती दिसत नाहीत तर कधीकधी त्या ओठांच्या आसपास देखील दिसतात, ज्या तुमचे हास्य खराब करतात. सुरकुत्या हे वृद्धत्वाचे लक्षण आहे, जे ३० नंतर बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावर दिसतात. (How to Stop Ageing sign)ओठांच्या आजूबाजूच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे खूप सामान्य आहे. (Skin Care Tips) याचे निराकरण करण्यासाठी महिला विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांचा अवलंब करतात. (Home remedies best way to removing wrinkles around lips)
अशा अनेक नैसर्गिक आणि घरगुती पद्धती आहेत, ज्याद्वारे या समस्येवर मात करता येते. इतकंच नाही तर काळाच्या ओघात महिला सौंदर्याबाबत खूप जागरूक झाल्या आहेत. म्हणूनच बोटॉक्स आणि इतर शस्त्रक्रिया उपचारांची मागणी बाजारात लक्षणीय वाढली आहे. (Anti ageing Tips) मात्र, एवढा पैसा खर्च करणे प्रत्येकाला शक्य नसते. लोक स्वस्त उपचार मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा जास्त परिणाम लवकर दिसून येत नाही. या लेखात तुम्हाला सुरकुत्या नये म्हणून काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही कमी वयात उद्भवत असलेल्या वय वाढीच्या खुणा टाळू शकता. (Anti Ageing home remedies)
नारळाच्या तेलाने फेस मसाज करा
आजकाल चेहऱ्याचा मसाज हा स्किन केअरचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन इत्यादी लावल्यानंतरही लोक काही मिनिटे मसाज करतात. यामुळे त्वचा तर आरामशीर राहतेच पण सुरकुत्याची समस्याही दूर होते. क्रिम्स चेहऱ्यावर लावून मसाज करून पहा. खालच्या ते वरच्या स्ट्रोकमध्ये आपल्या हातांनी ओठांच्या सभोवतालच्या त्वचेला मसाज करा. जर तुम्हाला मसाज दिवसातून दोनदा करणं शक्य नसेल तर एकदा तरी नक्की करा. यासाठी रात्रीची वेळ उत्तम आहे, यामुळे झोपही चांगली येईल.
आंबा गोड आहे की आंबट कसं ओळखाल? खरेदी करण्याआधी 'ही' ट्रिक वाचा अन् गोड, रसाळ आंबे खा
काकडी
काकडी हा त्वचेचा निळसरपणा दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. केवळ सुरकुत्याच नाही तर काळी वर्तुळे आणि त्वचेच्या इतर समस्याही याच्या वापराने दूर होतात. यासाठी काकडीचे तुकडे बारीक करून ओठांभोवतीच्या त्वचेवर लावा. सुकायला लागल्यावर पाण्याने स्वच्छ करा. चेहऱ्यावर फेस पॅक किंवा इतर कोणतेही साहित्य कोरडे झाल्यानंतर ठेवू नका, हे लक्षात ठेवा. यामुळे सुरकुत्याची समस्या दूर होण्याऐवजी वाढू शकते.
२ वेळा फेशियल व्यायाम करा
चेहऱ्याच्या व्यायामामध्ये तुम्हाला अनेक पर्याय सापडतील, ज्यामुळे ओठांच्या सभोवतालची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. जर तुम्ही हे व्यायाम दिवसातून दोनदा केले तर तुम्हाला महिनाभरात फरक दिसू लागेल. oo, aa, e सारखी अक्षरे १५ ते २० वेळा पुन्हा पुन्हा म्हणा. हा सर्वात सोपा व्यायाम आहे ज्यामुळे सुरकुत्या दूर होतील.
१) त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास सुरकुत्याची समस्या वाढू लागते. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत, त्यामुळे त्यांचा दररोज वापर करावा.
हिप्सवर बारीक दाणे, काळे डाग पडलेत? फक्त ४ उपाय, हिप्सवरील काळपट डाग कायमचे होतील दूर
२) अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसण्यामागे तणाव हे देखील एक प्रमुख कारण आहे. ते तुमचे सौंदर्य बिघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सुरकुत्या टाळायच्या असतील तर तणावमुक्त जीवन जगायला सुरुवात करा.
५ मिनिटात स्वच्छ होतील घाण झालेले गॅस बर्नर; ५ उपाय करा, किचन नेहमी राहील चकचकीत
३) पाण्याने अर्धे आजार बरे होतात. चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच घट्ट करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. हे तुमच्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे.