Join us  

डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सैल पडली? करा 4 व्यायाम, सुरकुत्या होतील कमी, दिसाल तरुण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 1:15 PM

How To Reduce Wrinkles Near Eyes: डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेलाही व्यायामाची गरज आहेच.. म्हणूनच तर त्या त्वचेला योग्य मसाज (face massage) देण्यासाठी करा हा ३ मिनिटांचा व्यायाम आणि दिसा अधिक तरुण.

ठळक मुद्देतरुण दिसायचं असेल तर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे.

आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हे आपल्या डोळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. तुम्ही आज किती फ्रेश आहात, किती उत्साही आहात किंवा मग आज तुमचा मुडच नाहीये, हे सगळ्यात आधी समोरच्याला सांगतात ते तुमचे डोळे (eyes). डोळ्यांभोवती सुरकुत्या (wrinkles) दिसायला लागल्या, डोळ्यांभोवतीची त्वचा काळवंडली तर त्यातून तुमच्या वयाची, तुमच्या आरोग्याची माहिती मिळते. त्यामुळे तरुण (few minutes exercise for young looking skin) दिसायचं असेल तर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच कोणते उपाय करायचे याची माहिती healthandbeautybyu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.

 

प्रत्येकीसाठीच हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असून यामध्ये काही सोपे- सोपे मसाज सांगितले आहेत. ३ मिनिटांचे हे मसाज केल्यास डोळ्यांभोवतीच्या त्वचेमध्ये येणारा सैलसरपणा कमी होतो. साधारण तिशीनंतर डोळ्यांभोवती फाईन लाईन्स म्हणजे अगदी बारीक सुरकुत्या यायला सुरुवात होते. हा त्रास कमी करायचा असेल तरी हे हेड मसाजचे प्रकार उपयुक्त ठरू शकतात. काही जणांचे डोळे कायम सुजलेले दिसतात. डोळ्यांभोवतीची ही सूज कमी करण्यासाठीही हा मसाज फायदेशीर ठरतो. शिवाय हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. टीव्ही बघताना, घरातल्या मंडळींसोबत गप्पा मारताना तुम्ही बसल्या बसल्या हे व्यायाम करू शकता. 

 

डोळ्यांभोवतीच्या त्वचेचा सैलसरपणा घालविणारे व्यायाम१. हा व्यायाम करण्यासाठी तुमच्या दोन्ही हातांचे अंगठे कानाच्यामागे डोक्यावर ठेवा. बाकीची बोटे मस्तकावर ठेवा. आता अंगठे एकाच जागी स्थिर ठेवून बाकी बोटांची गोलाकार हालचाल करा. ५ ते ६ वेळा क्लॉकवाईज आणि तेवढ्याच वेळा ॲण्टीक्लॉकवाईज बोटे फिरवा. बोटांच्या हालचालीसोबत भुवया आणि कपाळावरची त्वचाही ओढली जाईल, याची काळजी घ्या. 

चिंचेची पाने आणि पांढरे केस यांचा काय संबंध? वाचा हा  सोपा- चकटफू असरदार उपाय २. दुसरा व्यायाम करण्यासाठी भुवयांना मसाज द्यायचा आहे. यासाठी दोन्ही भुवया अंगठा आणि पहिलं बोट अशा चिमटीत पकडा. आणि अलगदपणे बाहेरच्या बाजूने तिरक्या दिशेने भुवया ओढा. भुवयीच्या पहिल्या टोकपासून शेवटच्या टोकापर्यंत असं हळूहळू करत न्या.

 

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हाताची अंगठा सोडून इतर चारही बोट कपाळावर ठेवा. बोटांनी कपाळावरची त्वचा वर- खाली अशा पद्धतीने ओढा.४. चौथ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हाताच्या बोटांनी कपाळावरची त्वचा वरच्या बाजूने ओढून धरा. आता एकदा डावीकडे तर नंतर उजवीकडे अशा पद्धतीने डोळे फिरवा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी